पंखा अन् कुलरची हवा, जेवायला देशी चिकन, तुपातील मटण : इम्रान खानची तुरुंगात मज्जाच मज्जा!

पंखा अन् कुलरची हवा, जेवायला देशी चिकन, तुपातील मटण : इम्रान खानची तुरुंगात मज्जाच मज्जा!

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात ऐशोआरामासाठी सर्वच सोयी-सुविधा पुरविले जात असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या बॅरेकमध्ये बेड, पंखा, कुलर अशा सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. शिवाय देशी चिकन आणि तुपातील मटण दिले जात असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयालाही याबाबत कल्पना देण्यात आली आहे. त्यामुळे इम्रान खान तुरुंगात नेमकी शिक्षा भोगत आहेत की मजा करत आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Pakistan’s former prime minister Imran Khan is being served desi chicken and mutton at the Attock Jail)

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकताच इम्नान खान यांच्या राहणीमानाचा अहवाल मागविला होता. तुरुंग प्रशासन त्यांना योग्य सुरक्षा आणि सुविधा पुरवत आहे, असे या अहवालात म्हंटले आहे. इम्रान खान यांना अटकच्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे. सादर अहवालानुसार, या तुरुंगातील सर्वात सुरक्षित ओळखला जाणारा ब्लॉक क्रमांक 2 मध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. 09X11 मापाचा हा ब्लॉक खास इम्नान खान यांच्यासाठी बनविला आहे. संपूर्ण सिमेंटच्या असलेल्या या ब्लॉकमध्ये छतावर पंखा बसविण्यात आला आहे.

ब्रिटनमध्ये ट्रॅफिक कंट्रोलमध्ये बिघाड; दुर्घटना टळली, AIR Traffic Control कसं काम करतं?

इम्रान खान यांना एक बेड, उशी, एक टेबल, काही वाचन साहित्य आणि एअर कूलरसह इतर सुविधाही पुरविण्यात आल्या आहेत. शिवाय नवीन टॉयलेट सीट, शॉवर, टिश्यू स्टँड आणि स्टेनलेस स्टीलचा नळ देण्यात आला आहे. अंघोळीसाठी आणि फेस वॉशसाठी मोठ्या काचेसह वॉश बेसिन बसविण्यात आले आहे. त्यांना त्यांच्या इच्छेनुसार आठवड्यातून दोनदा देशी चिकन आणि तुपात शिजवलेले मटणही दिले जाते. त्यांच्या सुरक्षेसाठी बॅरेकबाहेर सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत.

Earthquake : इंडोनेशियात जमीन हादरली! भूकंपाच्या धक्क्याने लोक घराबाहेर पळाले

तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणी इम्रान खान यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्यांना तीन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. खान यांना शिक्षा सुनावल्यानंतर पत्नी बुशरा बीबी यांनी सर्वोच्च न्यायालयाला इम्रानच्या ढासळत्या प्रकृतीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली. त्यानंतर पंजाबच्या गृहसचिवाकडून त्यांना सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. आता जेलमध्ये मिळत असलेल्या सुविधांवर इम्रान यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube