US : सिलिकॉन व्हॅलीनंतर आता अमेरिकेत सिग्नेचर बँकेचे दिवाळे
Signature Bank Collapses : सिलिकॉन व्हॅली बँकेनंतर अमेरिकेतील आणखी एक बँक बंद झाली आहे. न्यूयॉर्क येथील सिग्नेचर बँकेचे दिवाळे निघाले आहे. रविवारी या बँकेला ताळे मारण्यात आले. नियामक मंडळाने ही बँक बंद केली आहे. विशेष म्हणजे मागच्याच आठवड्यात सिलिकॉन व्हॅली ही बँक बंद करण्यात आली होती.
सिग्नेचर बँकेचे दिवाळे हे अमेरिकेच्या इतिहासातील तीन नंबरचे सर्वात मोठे दिवाळे आहे. याआधी गेल्या आठवड्यात बंद झालेल्या सिलिकॉन व्हॅली बँकेचे दिवाळे हे दोन नंबरचे होते. सिलिकॉन व्हॅली बँक बंद झाल्यानंतर केवळ 48 तासांमध्ये ही बँक बंद झाली आहे. याअगोदर 2008 साली वॉशिंग्टन म्यूचुअल या बँकेचे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे दिवाळे निघाले होते.
न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या खातेधारकांना या बँकेतून पैसे काढता येतील. तसेच या बँकेतील सर्व खातेधारकांना त्यांचे पैसे परत करण्यात येतील, असे बँकेच्या नियामक मंडळाने म्हटले आहे. सिलिकॉन व्हॅलीच्या खातेधारकांना देखील अशाच पद्धतीने पैसे परत केले जात आहेत. त्यामुळे करदात्यांना कोणत्याही स्वरुपाचे नुकसान होणार नाही.
सिग्नेचर बँकेची एकुण संपत्ती 110.36 अरब डॉलर एवढी होती. तर 31 डिसेंबर पर्यंत 88.59 अरब डॉलर एवढी रक्कम बँकेकडे जमा होती. न्यूयॉर्क डिपार्टमेंट ऑफ फायनान्शिअल सर्विसेजने याची माहिती दिली आहे.
Pawan Khera : तुम्ही देशाच्या तीन पिढयांचा अपमान केला; मोदीजी तुम्ही पंतप्रधान आहात, देश, देव नाहीत
दरम्यान काही दिवसांपूर्वी सिलिकॉन व्हॅली ही बँक देखील बंद झाली आहे. सिलिकॉन व्हॅली ही अमेरिकेतील 16 वी सर्वात मोठी बँक आहे. 2008 च्या आर्थिक संकटानंतर एवढी मोठी बँक बंद पडली आणि त्यामुळे तंत्रज्ञान उद्योगाला मोठा धक्का बसला. बँकेची मालमत्ता $209 अब्ज आणि ठेवी $175.4 अब्ज होती. ही बँक नवीन युगातील तंत्रज्ञान कंपन्या आणि भांडवल गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना आर्थिक सहाय्य पुरवत असे. यावेळी SVB ठेवींनी $250,000 मर्यादा ओलांडली हे स्पष्ट नव्हते.