भूकंपाने अख्खा देशच हादरला! शंभरपेक्षा जास्त इमारती ढासळल्या, पळापळीत अनेक जखमी

भूकंपाने अख्खा देशच हादरला! शंभरपेक्षा जास्त इमारती ढासळल्या, पळापळीत अनेक जखमी

Earthquake in China : देशाची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागात काल रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. तसाच शक्तीशाली भूकंप चीनमध्येही झाला. चीनच्या शेडोंग प्रांतात भूकंपाचे जोरदार झटके जाणवले. भूकंपाचा धक्का इतका जोरदार होता की इमारती स्प्रिंगसारख्या हलू लागल्या. त्यामुळे लोक घाबरून इमारतीबाहेर पळाले. या धावपळीत अनेक जण पडल्याने जखमीही झाले.

हा भूकंप रविवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास झाला. देशातील लोक गाढ झोपेत असताना हा भूकंप झाला. दिवस उजाडताच या भूकंपाचं विदारक दृश्य समोर आलं. या भूकंपामुळे जवळपास 126 इमारती जमीनदोस्त झाल्या. अनेक घरे कोसळली. या भूकंपात आतापर्यंत 21 लोक जखमी झाले आहेत. या भूकंपामुळे अख्खा देशच हादरला आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.5 एवढी नोंदवली गेली. चीनमधील देऊझो हा प्रांत भूकंपाचा केंद्रबिंदू होता. जमिनीखाली फक्त दहा किलोमीटरवरच भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याने मोठा हाहाकार उडाला. इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. चीनी भूकंप नेटवर्क केंद्राच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.5 इतकी नोंदविण्यात आली.

या भूकंपाची तीव्रता लक्षात घेता रेल्वे वाहतूक तत्काळ रोखण्यात आली. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी गॅस पाइपलाइन फुटली आहे. त्यामुळ गॅस पाइपलाइनचा पुरवठा रोखण्यात आला आहे. गॅस पाइपलाइन तसेच रेल्वे ट्रॅकचे इन्स्पेक्शन केले जात आहे.

दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के

दिल्ली-एनसीआरमध्ये काल रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी होती. रात्री उशिरा 9.34 मिनिटांनी हे धक्के जाणवले. जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाचे धक्के केवळ दिल्ली-एनसीआरमध्येच नव्हे तर आसपासच्या भागातही जाणवले. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील लाहोर, पेशावर भागात भूकंप झाला. मात्र, आतापर्यंत कुठूनही नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

मोठी बातमी : तोषखाना प्रकरणात इम्रान खान दोषी, न्यायालयाकडून 3 वर्षांची शिक्षा; लाहोरमधून अटक

याआधी, आज पहाटे जम्मू-काश्मीरमधील गुलमर्गमध्ये 5.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (एनसीएस) सकाळी 8:36 वाजता भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती दिली. भूकंपाचा केंद्रबिंदू गुलमर्गपासून 184 किमी अंतरावर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 129 किमी खाली होता. अहवालांनुसार, या वर्षी जूनपासून जम्मू-काश्मीरमध्ये वेगवेगळ्या तीव्रतेचे 12 धक्के बसले आहेत. यापूर्वी, 10 जुलै रोजी सकाळी जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात 4.9 तीव्रतेचा भूकंप झाला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube