Israel Election Result : नेतान्याहुंची आघाडी 8 जागा दूरच…संसदीय निवडणुकीत अखेर त्रिशंकू कौल!

इस्त्राइलच्या संसदीय निवडणुकीत सत्ताधारी नेतान्याहू यांची आघाडी 8 जागांसाठी दूरच राहिल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

Untitle (2)

Israel Election Result : इस्त्राइलमध्ये मंगळवारी पार पडलेल्या संसदीय निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी नेतान्याहू यांची आघाडी 8 जागांसाठी दूरच राहिल्याचं चित्र पाहायला मिळतंय. निवडणूक निकालात नेतन्याहूंच्या आघाडीला 120 पैकी 53 जागांवर विजय मिळाला असून प्रतिस्पर्धी असलेल्या याशर पार्टीला 48 जागांवर यश मिळाले आहे. तर अरब पक्षाला 19 जागा मिळाल्या असून अरब पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहे.

इस्त्रायलमध्ये मंगळवारी संसदीय निवडणुकीचे सुरूवातीचे निकाल आले असून त्यात नेतन्याहूंच्या नेतृत्वाखालील युतीने आघाडी घेतली आहे. बुधवारी सकाळी ५५.४ टक्के मतांची मोजणी झाली होती. त्यात नेतन्याहू यांच्या नेतृत्वातील युतीला ५६ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात होता.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
नेतन्याहू यांच्या समर्थनात ज्यावेळी मी उतरलो त्यावेळी निवडणुकीचा माहोल बतलला. ट्रम्प यांच्या पोस्टनुसार नेतन्याहू यांना या निवडणुकीत पराभव सहन करावा लागला असता. आता स्पर्धा ही बरोबरती आली आहे. किंवा त्यांचा विजय होण्याची शक्यता असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय.

इस्रायलमध्ये आतापर्यंत ९३ टक्के मतांची मोजणी पूर्ण झाली असून, नेतान्याहू यांचा गट गादी आयसेनकोट यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीच्या पुढे गेला आहे. मात्र, कोणताही गट संसदीय बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ६१ जागांपर्यंत पोहोचताना दिसत नाही. अंदाजानुसार, नेतान्याहू यांच्या आघाडीला 53 जागा मिळाल्या असून आयसेनकोट यांची आघाडीला 48 जागा मिळाल्या आहेत. अरब पक्षांनी विक्रमी १९ जागा जिंकल्या आहेत.

follow us