Israel Hamas War : युद्ध थांबणार ? ‘त्या’ कराराला इस्त्रायलने दिली मंजुरी

Israel Hamas War : युद्ध थांबणार ? ‘त्या’ कराराला इस्त्रायलने दिली मंजुरी

Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अजूनही (Israel Hamas War) संपलेलं नाही. या युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. हमासचा नायनाट करण्याबरोबरच त्याच्या तावडीतील आपल्या लोकांची सुटका करण्यासाठी इस्त्रायलचं सैन्य मैदानात उतरलं आहे. कोणत्याही हमासला (Hamas) संपवू असा इरादा इस्त्रायलचा आहे. तरी देखील हे विनाशकारी युद्ध थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न केले जात असताना आता तशी शक्यता निर्माण होताना दिसत आहे. युद्धविराम होईल अशी चिन्हे दिसत आहेत. इस्त्रायली मंत्रिमंडळान गाझातील (Gaza City) ओलिसांच्या सुटकेसाठी हमासबरोबरच्या एका कराराला मंजुरी दिली आहे. हमासही काही लोकांची सुटका करण्यास तयार आहे.

Israel Hamas War : गाझा पट्टीतील युध्द थांबवण्याची मागणी करणारा प्रस्ताव UN मध्ये मंजूर, अमेरिका मतदानासाठी गैरहजर

इस्त्रायलच्या मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत या कराराला मंजुरी देण्यात आली. एएफपी वृत्तसंस्थेने या बैठकीचे वृत्त दिले आहे. तर टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार येत्या चार ते पाच दिवसात हमास त्यांच्याकडे ओलीस ठेवण्यात आलेल्या 50 नागरिकांची सुटका करील. यामध्ये लहान मुले आणि त्यांच्या मातांचा समावेश असेल. इस्त्रायलमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हा करार फक्त लहान मुले आणि महिलांशी संबंधित आहे. अमेरिका आणि कतर या देशांकडून या करारासाठी प्रयत्न केले जात होते.

इस्रायलने गाझातील सर्वात मोठ्या रुग्णालयाचा ताबा घेतला

इस्त्रायली सैन्याने बुधवारी गाझातील सर्वात मोठे रुग्णालय अल-शिफा ताब्यात घेतले. इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) सांगितले की, रुग्णालयाच्या तळघरात मोठ्या प्रमाणात शस्त्रे सापडली आहेत. यापूर्वी रुग्णालयात अनेक ठिकाणी हमासच्या दहशतवाद्यांशी चकमक झाली होती. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, अजूनही अनेक रुग्णालयांमध्ये दहशतवादी असू शकतात.

Israel Hamas War : बंदिस्तांच्या सुटकेसाठी इस्त्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाबाहेर निदर्शने

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube