इस्रायलचे ‘आयर्न डोम’ इराणने भेदले ? कसे काम करते ‘सुरक्षाकवच’ ?

Israel-Iran war-इस्रायल (Israel) आणि इराण (Iran) यांच्यात युद्ध भडकलंय. गेल्या चार दिवसांपासून एकमेंकावर तुफान बॉम्ब, ड्रोन हल्ले सुरू आहेत. क्षेपणास्त्रही डागले जातायत. दोन्ही देशांमधील अनेक शहरांवर हल्ले होतायत. दोन्ही देशांमधील वाद शुक्रवारी भडकला. त्याचे कारण आहे अणुशस्त्र तयार करणे. इराण अण्वस्त्रसज्ज होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचे कारण देत इस्रायलने इराणच्या न्यूक्लिअर साईट्सवर मारा केला. इस्रायलने या मिशनला ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ असे नावही दिले. त्याला इराणने लगेच जोरदार प्रत्युत्तर देत ऑपरेशन ट्रू प्रॉमिस नावाची मोहिम सुरू केलीय. या मोहिमेत इराणने इस्रायलच्या दिशेने 150 पेक्षा जास्त बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, ड्रोन डागलेत. तर इस्रायलचे सुरक्षा कवच असलेले ‘आयर्न डोम’ (Israel’s Iron Dome) ही सुरक्षा यंत्रणाही इराणच्या क्षेपणास्त्राने भेदली असल्याचे बोलले जात आहे. इराणने इस्रायलवर 180 क्षेपणास्त्रांनी हल्ले केले. त्यात काहीच हल्ले यशस्वी झाले. त्यात इस्रायलचे पंतप्रधान बेजामीन नेतान्याहू यांच्या आलिशान व्हिलावर इराणने क्षेपणास्त्र हल्ला केलाय. नेतान्याहू यांचे घरही आर्यन डोमच्या सुरक्षा कवचमध्ये होते. सुरक्षा कवच असलेली आयर्न डोम यंत्रणाने भेदल्याने ही यंत्रणा चर्चेत आलीय. आर्यन डोम काय आहे ही यंत्रणा कशी काम करते हेच जाणून घेऊया…
आयर्न डोम कसे काम करते ?
इस्रायलचे सुरक्षा कवच आयर्न डोम शत्रू राष्ट्राकडून येणाऱ्या सर्व क्षेपणास्त्रांना नष्ट करते. डिटेक्शन, ट्रॅकिंग रडार, कंट्रोल सेंटर, मिसाइल फायरिंग यूनिट असे आयर्न डोमचे कार्य आहे. (Israel-Iran war)
खामेनेईंना मारल्यास युद्ध संपणार? उत्तराधिकारी कोण असणार? इस्त्रायलच्या विविधानाने चर्चांना उधाण
डिटेक्शन आणि ट्रॅकिंग रडार कसे काम करतो ?
शत्रू राष्ट्राकडून इस्रायलकडे येणाऱ्या क्षेपणास्त्राचे ट्रॅकिंग आयर्न डोम करते. कोणते क्षेपणास्त्र येत आहे आणि कुठून येत आहे हे ट्रॅक केले जाते.
कंट्रोल सेंटर कसे काम करते ?
शत्रू राष्ट्राकडून येणारे क्षेपणास्त्राचा परिणाम किती होईल आणि हे क्षेपणास्त्र कुठल्या भागात पडणार आहे कंट्रोल सेंटर माहीत करून घेते. क्षेपणास्त्र हे नागरी भागात येत नसेल तर सिग्नल दिला जात नाही. जर क्षेपणास्त्र हे लोकवस्तीत पडणार असेल तर कंट्रोल सेंटर पुढे तसा सिग्नल पाठविते.
क्षेपणास्त्र फायरिंग यूनिटचे काम काय ?
कंट्रोल सेंटरकडून क्षेपणास्त्र येत असल्याचे सिग्नल येताच मिसाइल फायरिंग यूनिट अॅक्टिव होते. त्यानंतर शस्त्रकडून आलेले क्षेपणास्त्र किंवा रॉकरेट हे हवेतच नष्ट केले जाते. हवेतच क्षेपणास्त्र नष्ट करण्याचा सक्सेस रेट हा तब्बल 98 टक्के आहे. तब्बल 70 किलोमीटर लांबूनच क्षेपणास्त्र डिटेक्ट केले जाते.
मोठी बातमी! हरभजन अन् युवराज सिंह ED च्या कचाट्यात ‘हा’ अभिनेताही अडकला, चौकशी सुरू
आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टिम इराणने कधी घेतली ?
शत्रू राष्ट्र लेबनॉनने इस्रायलवर चार हजार क्षेपणास्त्र डागली होती. यात 44 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला 2006 मध्ये झाला होता. त्यानंतरच सुरक्षा कवच घेण्याचा निर्णय इस्रायलने घेतला. अमेरिकेकडून ही यंत्रणा विकत घेतली.
इस्रायलला शत्रूंपासून संरक्षण देणाऱ्या या आयर्न डोमची किंमत सुमारे 50 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. ती खूप महाग आहे.
अनेक रॉकेट नष्ट केले
2011 मध्ये बेशिबा परिसरात ही यंत्रणा बसविण्यात आली. या सुरक्षा कवचने 2014 पर्यंत 1200 रॉकेट हवेत नष्ट केले आहेत. संपूर्ण इस्रायलसाठी सुरक्षेचे तीन ते चार थर आहेत. त्यापैकी हा सर्वात महत्त्वाचा थर आहे. जेव्हा हमास, लेबनॉन, इराण सारखा कोणताही शत्रू इस्रायलवर कोणतेही क्षेपणास्त्र किंवा रॉकेट डागतो तेव्हा आयर्न डोम यंत्रणा हवेच हे क्षेपणास्त्र नष्ट करते. त्यामुळे आतापर्यंत इस्रायलची सुरक्षा झालेली आहे. परंतु आता ही आयर्न डोम यंत्रणा इराणच्या क्षेपणास्त्राने भेदली असा दावा इराणकडून केला जात आहे. परंतु त्याला अद्याप पुष्टी मिळू शकलेली नाही.