Japan PM : भाषण चालू असतानाच बॉम्बहल्ला; जपानचे पंतप्रधान थोडक्यात बचावले

  • Written By: Published:
Japan PM : भाषण चालू असतानाच बॉम्बहल्ला; जपानचे पंतप्रधान थोडक्यात बचावले

जपानचे पंतप्रधान (Japan PM) फुमियो किशिदा यांच्या सभेत झालेल्या स्फोटामुळे जगभरात पुन्हा खळबळ माजली आहे. PM Fumio भाषण देत असताना त्यांच्यावर स्मोकबॉम्बने हल्ला केला. पंतप्रधानांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले असून पोलिसांनी घटनास्थळावरून एका व्यक्तीला अटक केली आहे.

द जपान टाईम्सच्या माहितीनुसार वाकायामा शहरात पंतप्रधान फुमियो किशिदा आपले भाषण सुरू करणार, त्याआधीच हा स्फोट झाला. स्मोक बॉम्ब फेकल्यानंतर आजूबाजूला धुराचे लोट पसरले होते. घटनास्थळी जमलेले लोक सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी धावताना दिसत असल्याचे या घटनेच्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

‘भारतविरोधी शक्तीवर कारवाई करा’ पंतप्रधान मोदींची ऋषी सुनक यांच्याशी चर्चा

या स्फोटानंतर पंतप्रधान किशिदा थोडक्यात बचावले असल्याची माहिती येत आहे. फुमियो किशिदा हे सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ भाषण देणार होते. दरम्यान सुरक्षा दलांनी एका व्यक्तीला पकडले.

शिंजो आबे यांच्यावरही झाला होता हल्ला

जपानमध्ये अशा प्रकारे दुसऱ्यांदा सुरक्षेचा भंग झाला आहे. यापूर्वी माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची गेल्या वर्षी ८ जुलै रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. भाषणादरम्यान शिंजो आबे यांच्यावरही हल्ला करण्यात आला. नारा शहरात ते भाषण देत असताना त्याचवेळी त्यांच्यावर गोळीबार झाला आणि ते अचानक खाली पडले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात आणले असता त्यांचा मृत्यू झाला.

Sanjay Raut : अमित शाह हे महाविकास आघाडीची सभा पाहायला येत आहेत

फुमियो किशिदा 2021 मध्ये जपानचे पंतप्रधान झाले. यासोबतच ते लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे (एलडीपी) अध्यक्ष आहेत. त्यांनी 2012 ते 2017 पर्यंत परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले आणि 2017 मध्ये त्यांनी हंगामी संरक्षण मंत्री म्हणून काम केले. 2017 ते 2020 पर्यंत त्यांनी एलडीपी पॉलिसी रिसर्च कौन्सिलचे अध्यक्षपद भूषवले. नुकतेच किशिदा भारतात आले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube