युद्ध पेटलं ! हल्ल्यानंतर इराणचेही थेट प्रत्युत्तर; अमेरिकेचे लष्करीतळं उद्धवस्त

Israel strikes Iran-या दोन्ही देशांनी इराणावर हवाई हल्ले केले आहेत. त्यानंतर इराणाने मागे पुढे न पाहता थेट अमेरिकेच्या लष्करी तळावर थेट हल्ले केले आहेत.

  • Written By: Published:
US, Israel Attack Iran

War begins in middle east as US & Israel strikes Iran: इराणच्या (Iran) अण्वस्त्र कार्यक्रमाच्या विरोधात इस्रायल (Israel) आणि अमेरिकेने थेट लष्करी कारवाई सुरू केलीय. या दोन्ही देशांनी इराणावर हवाई हल्ले केले आहेत. त्यानंतर इराणाने मागे पुढे न पाहता थेट अमेरिकेच्या लष्करी तळावर थेट हल्ले केले आहेत. त्यामुळे मध्य-पूर्व आशियामध्ये युद्धाला तोंड फुटले आहेत. आतापर्यंत या तिन्ही देशांमध्ये काय-काय घडलंय हेच व्हिडिओतून जाणून घेऊया…


अमेरिका-इस्रायलकडून पहाटे इराणवर हल्ला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सकाळीच एक घोषणा केली. इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे 28 फेब्रुवारीच्या पहाटे इराणवर लष्करी कारवाई सुरू केलीय. इराणच्या अनेक शहरांवर हवाई हल्ले करण्यात आलेत. इराणची राजनाधी तेहरान, कोम,, इस्फहान, केरमानशाह आणि कारजसह या शहरांवर हल्ला केलाय. या कारवाईला इस्रायलने अधिकृतपणे ऑपरेशन लायन्स रोअर हे नाव दिले आहेत. तर अमेरिकेने या कारवाईला ऑपरेशन एपिक फ्युरी असे नाव दिलंय.


थेट ट्रम्पकडूनच कारवाईची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर मोठ्या लष्करी कारवाईची घोषणा केलीय. याबाबत एक व्हिडिओच त्यांनी जारी केला. इराणविरुद्धच्या कारवाईसाठी आम्ही इस्रायलबरोबर लष्करी कारवाई करत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटल आहे. इराणचे क्षेपणास्त्र नष्ट करणे, अणू कार्यक्रम कार्यक्रम कायस्वरूपी बंद करणे, राजवट उलथवून लावण्यासाठी ही कारवाई सुरू केल्याचे ट्रम्प यांनी म्हटलंय. अमेरिकेने यापूर्वीच मध्य पूर्वेत नौदल, हवाई दल तैनात केले होते. याच दरम्यान इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी जनतेला संबोधित केले आहे. इराणमधील जनतेला वांशिक समुदायांना त्यांच्या नेतृत्वाखाली जोखाडातून सुटका करायची आहे, त्यासाठी ही कारवाई सुरू केलीय. इराण दहशतवाद्यांना पोसत असून, त्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी ही कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.


कुठे-कुठे हल्ले केलेत ?

इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स गुप्तचर मुख्यालय, लष्करी तळ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ठेवलेल्या भागावर अमेरिकेने हल्ले केले आहेत. तेहरानच्या मध्यभागी जोरदार स्फोट झाले आहे. राष्ट्रपतींचे घर आमि सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयाजवळ हल्ले झाले आहेत.


इराणचे थेट प्रत्युत्तर; अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले

त्यानंतर इराणने हे थेट प्रत्युत्तर दिलंय. इराणने उत्तर इस्रायल आणि तेल अवीववर ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केलाय. इस्रायली सरकारने देशभरात आणीबाणीची घोषणा केली केलीय. तसेच डिफेन्स इंटरसेप्शन सिस्टीम सक्रिय केलीय. तर अमेरिकेच्या लष्करी तळावर इराणने हवाई हल्ले सुरू केलेत. बहिरनची राजधानी मनामा येथील अमेरिकेन नौदलाच्या तळावर हल्ला केलाय. तसेच कतार आणि युएईमध्ये मोठे स्फोट झाले आहेत. दोन्ही ठिकाणी अमेरिकेचे महत्त्वाचे लष्करी तळे आहेत.


अनेक देशांचे हवाई क्षेत्र बंद

अचानक युद्ध सुरू झाल्याने मध्य-पूर्वेला मोठा धक्का बसलाय. इराण, इस्रायल, इराक, युएई, बहरीन आणि कतार या सर्व देशांनी त्यांचे हवाई क्षेत्र अनिश्चित काळासाठी बंद केलंय.

follow us