चक्रीवादळाने अतोनात नुकसान! पंतप्रधान मोदींचा श्रीलंकेच्या राष्ट्रपती दिसानायकेंना फोन

चक्रीवादळ संकटात भारताने या संकटाच्या काळात श्रीलंकेला मदत साहित्य पाठवले असून बचाव पथके घटनास्थळी काम करत आहेत.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 01T225434.032

भारताच्या गेल्या काही दिवसांपासून दक्षिणेकडील देश श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळाचा कहर पहायला मिळत आहे. या चक्रीवादळात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. (Cyclone) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. या कठीण काळात भारत श्रीलंकेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, आम्ही सर्वतोपरी मदत करण्यास पूर्णपणे तयार आहोत असं आश्वासनही पंतप्रधानांनी त्यांना दिलं आहे.

भारताने या संकटाच्या काळात श्रीलंकेला मदत साहित्य पाठवले असून बचाव पथके घटनास्थळी काम करत आहेत. ही मदत भारताची मानवतावादी भूमिकेतून केली जात आहे. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती दिसानायके यांना आश्वासन दिले की सागर बंधू ऑपरेशन अंतर्गत श्रीलंके बचाव आणि मानवतावादी मदत पुरवली जाईल. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की, भारताच्या त्वरित मदतीमुळे श्रीलंकेच्या बाधित भागात मदत कार्य वेगवान झाले आहे.

थायलंड आणि मलेशियात सेन्यार चक्रीवादळाचा हाहाकार; ४६० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू

भारतीय बचाव पथके आणि मदत वेळेवर मिळाल्याने अनेक भागात तात्काळ मदत पोहोचवण्यास मदत झाली. श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी भारताचे आभार मानताना भारताच्या या कृतीचे वर्णन मैत्री आणि विश्वासाचे उदाहरण म्हणून केले. दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल आहे. मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि समुद्रातील लाटा यामुळे हजारो लोकांना स्थलांतरित करावे लागले आहे. भारताच्या मदत पथकांनी तातडीने किनारी भागात मदतकार्य केले आणि शेकडो लोकांचा जीव वाचवला.

भारताने या लोकांसाठी, अन्न, पाणी आणि तात्पुरता निवारा बांधण्यासाठी असणाऱ्या साहित्य समाविष्ट होते. आगामी काळातही भारत श्रीलंकेला मदत करेल असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले आहे. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती दिसानायके यांना सांगितले की, भारत हिंदी महासागर क्षेत्रातील देशांसोबत सहकार्य आणि मानवतावादी मदतीला प्राधान्य देतो. नैसर्गिक आपत्तींच्या काळात भारत नेहमीच श्रीलंकेचा पहिला मित्र राहिला आहे. आगामी काळातही भारत नेहमी श्रीलंकेला मदत करेल.

follow us