भाजप आणि संघाच्या मित्रांना माझे गुरू मानतो – राहुल गांधी

भाजप आणि संघाच्या मित्रांना माझे गुरू मानतो – राहुल गांधी

नवी दिल्ली : भाजप आणि संघाच्या मित्रांना मी माझे गुरू मानतो. कारण त्यांच्यामुळे राजकारण म्हणजे काय? हे समजले आहे. माझ्यावर हल्ला करणाऱ्या आरएसएस आणि भाजपच्या मित्रांचे धन्यवाद. त्यांनी माझ्यावरील हल्ले असेच सुरू ठेवावे, असे प्रत्युत्तर राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत भाजपला दिले आहे.

माझी बदनामी करण्यासाठी भाजपने हजारो कोटी रुपये खर्च केले. याआधी मी यावर 99 टक्के विश्वास ठेवत होतो. मात्र आता मला 100 टक्के खात्री आहे की, भाजपने बदनामीसाठी हजारो कोटी खर्च केले.

मात्र सत्य लपविण्यासाठी कितीही खर्च करा किंवा कितीही कॅम्पेन चालवा, काहीही होणार नाही, राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत भारत जोडो यात्रेवर भाजपकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

भारत जोडो यात्रेत कोणी यावे हे प्रत्येकाने स्वत: ठरवावे. विरोधकांचे देखील या यात्रेत स्वागत आहे. इतर पक्षांनी देखील भारत जोडो यात्रेचे स्वागत केले आहे. अखिलेश, मायावती सहभागी झाले कारण आमचे विचार सारखे आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या सुरक्षेवर देखील राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी म्हणाले, सरकारची इच्छा आहे की, मी भारत जोडो यात्रा बुलेट प्रुफ गाडीने करावी.

परंतु ते मला मान्य नाही. जेव्हा भाजपचे नेते रोड शो करतात तेव्हा कोणते पत्र लिहिले जात नाही. आणि आता म्हणतात की, राहुल गांधी नियमांचे उल्लंघन केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube