Invisible Gold : जगातील सर्वात मोठा खजिना सापडला…जपानी वैज्ञानिकांनी सोनं शोधून काढलं
जपानी वैज्ञानिकांनी खोल समुद्रात 700 मीटर खाली सोन्याचा प्रचंड साठा शोधून काढला असून हा जगातील सर्वात मोठा खजिना सापडला आहे.
Invisible Gold : जपानी वैज्ञानिकांनी खोल समुद्रात 700 मीटर खाली सोन्याचा प्रचंड साठा शोधून काढला आहे. हा जगातील सर्वात मोठा खजिना सापडला असून जपानची राजधानी टोकियोपासून 360 किमी दूर समुद्रात हे मोठं यश मिळालं आहे. वैज्ञानिकांना 700 मीटर खोलीत फुल गोल्डच्या आत खरं सोनं सापडलं असून हे सोनं दगडाच्या अणू पातळीवर दडलेलं आहे. समुद्राच्या तळाशी ज्वालामुखी आहेत. या ज्वालामुखींच्या जवळ दगडांमध्ये हे अदृश्य सोनं मिळालं असून या खडकांचे नमुने रोबोटिक पाणबुड्यांच्या साहाय्याने काढण्यात आले आहेत. या शोधाने भूगर्भशास्त्रज्ञांना चकित केलं असून यामुळे भविष्यात जगभरातील सोन्याच्या खाणकामाची पद्धत पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
फूल गोल्ड काय असतं? यातील सोन्याचा खजिना कसा मिळाला?
पायराइट हा एक प्रकारचा आयर्न सल्फाइड धातू असून पिवळा रंग आणि चमक हा अगदी सोन्यासारखा दिसतो. त्यामुळे याला फुल गोल्ड म्हटलं जातं.
संशोधकांनी रोबोटिक पाणबुड्यांच्या साहाय्याने समुद्राच्या तळापासून खडकांचे नमुने गोळा केले असून लॅबमध्ये या दगडात लहान लहान छिंद्र करीत त्यातून पाहण्यात आलं. यासाठी सेकंडरी-आयन मास स्पेक्ट्रोनेट्री तंत्रज्ञानाचा वापर झाला. या दगडांमधील सोन्याचे प्रमाण विक्रमी स्तरावर असून ते १.९ टक्के वजनापर्यंत पोहोचलं आहे, जे खूपच जास्त आहे, असे उघड झालं.
समुद्रात खोल असलेलं सोनं इतर खाणीपेक्षा वेगळं कसं आहे?
सर्वसाधारणपणे सोन्याच्या खाणीत सोनं दाणे किंवा तुकड्यांच्या स्वरुपात मिळतं. मात्र खोल समुद्रात मिळालेलं सोनं अत्यंत वेगळं आहे. हा धातू सीफ्लोर पाइराइटच्या क्रिस्टल लॅटिसच्या आत एक सॉलिड सॉल्यूशनच्या स्वरुपात आहे. सायन्टिफिक रिपोर्टमध्ये पब्लिश झालेल्या या रिसर्चने अनेक जुने समज मोडीत काढले आहेत.
स्विगीवरून आता LPG मागवता येणार; काही मिनिटांत होणार होम डिलिव्हरी, करार झाला
दरम्यान, या अभ्यासात, संशोधकांनी सर्व सक्रिय ठिकाणांवरून नमुने गोळा केले. हे नमुने त्यांच्या आकारानुसार चार गटांमध्ये विभागले गेले. काही दगडांची पूड करण्यात आली. त्यानंतर, मास स्पेक्ट्रोमीटरचा वापर करून त्यातील सोने आणि आर्सेनिकचे प्रमाण मोजण्यात आले. इलेक्ट्रॉन बीमद्वारे शिसे, तांबे आणि आर्सेनिक यांसारख्या धातूंच्या वितरणाचे मापन करण्यात आले. त्यानंतर, दगडांमधील सोन्याचा अणू पातळीवर शोध घेण्यासाठी अति-संवेदनशील तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.
सोनं दगडात कसं राहू शकतं, यावर वैज्ञानिक सर्वाधिक हैराण झाले आहेत. सोनं हे खनिजामध्ये अडकलेल्या लहान तुकड्यांच्या स्वरूपात नव्हतं. उलट, सोनं पायराइटच्या स्फटिक रचनेत अणू-अणूने विणलेले होते. जेव्हा आर्सेनिक, शिसे आणि तांबे यांसारखे घटक उपस्थित असतात, तेव्हाच हे शक्य असतं. हे घटक पायराइटच्या जाळीची रचना बदलतात, ज्यामुळे अशा जागा तयार होतात ज्यात सोन्याचे अणू स्फटिकांमध्ये बसू शकतात.दगडांमध्ये आर्सेनिकचे प्रमाण वाढल्याने, सोन्याची घनता देखील वाढली. आर्सेनिकने मूलतः गंधकाची जागा घेतली, ज्यामुळे मोठ्या सोन्याच्या आयनांसाठी जागा निर्माण झाली.