इंडोनेशियामध्ये काही तासांमध्ये दुसऱ्यांदा भूकंप; 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेने हादरली जमीन
earthquake in Indonesia इंडोनेशियाला पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. उत्तर सुमात्रा परिसरात 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला.
Second earthquake in Indonesia within some hours ground shaken by 6.8 magnitude tremor : इंडोनेशियाला शनिवारी पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. उत्तर सुमात्रा परिसरात 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला. काही तासांपूर्वीच देशात 7.7 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला होता. या भूकंपात आतापर्यंत किमान 38 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आलेल्या ताज्या भूकंपाचे धक्के जमिनीखाली सुमारे 163 किलोमीटर खोलीवर नोंदवण्यात आले. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस (GFZ) ने या भूकंपाची पुष्टी केली आहे.
“त्यांना रॉचे अध्यक्ष करायला पाहिजे”; सिस्पे घोटाळ्यावरून सुजय विखेंचा निलेश लंकेंना टोला
शनिवारी सकाळी इंडोनेशियातील फ्लोरेस परिसराच्या किनारपट्टीजवळही भूकंपाचा मोठा धक्का जाणवला. या पार्श्वभूमीवर नुसा तेंगारा भागातील काही ठिकाणी सुनामीचा इशारा जारी करण्यात आला होता. मात्र, परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा इशारा मागे घेण्यात आला. भूकंपाचे हादरे अनेक भागांत जाणवले. काही ठिकाणी परिस्थिती गंभीर झाल्याने नुकसानीचा आढावा घेण्यासाठी रुग्णालये रिकामी करण्यात आली. अनेक इमारतींचेही मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
भूकंपामुळे दरड कोसळली, वीजपुरवठाही खंडित
भूकंपानंतर काही भागांत दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या असून वीजपुरवठाही खंडित झाला आहे. त्याचबरोबर काही प्रभावित भागांतील दळणवळणाची यंत्रणाही विस्कळीत झाली आहे.दरडी कोसळून रस्ते बंद झाल्यामुळे बचाव पथकांना भूकंपाच्या केंद्राजवळील नागेकेओ परिसरात पोहोचण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे बचावकार्याला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
‘ब्लूई’ आता मोठ्या पडद्यावर; ऑगस्ट 2027 मध्ये प्रदर्शित होणार चित्रपट
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओ आणि छायाचित्रांमध्ये भूकंपाची तीव्रता दिसून येत आहे. काही इमारती कोसळून ढिगाऱ्यात रूपांतरित झाल्या आहेत. तर काही ठिकाणी इमारती कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उठताना दिसत आहेत. भूकंपाचे जोरदार धक्के जाणवताच नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर धाव घेतल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे.दरम्यान, प्रभावित भागात बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
‘भूकंपाचे धक्के अत्यंत भीषण होते’
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, तालिबुरा येथील 51 वर्षीय नोना यांनी भूकंपाचा अनुभव सांगताना हादरे अत्यंत तीव्र असल्याचे म्हटले. त्या वेळी कुटुंबासह घरात आराम करत असताना अचानक जोरदार धक्के जाणवू लागले, असे त्यांनी सांगितले.