अमेरिकेत घरात घुसून गोळीबार, सहा महिन्यांच्या बाळासह सहा जणांचा मृत्यू

अमेरिकेत घरात घुसून गोळीबार, सहा महिन्यांच्या बाळासह सहा जणांचा मृत्यू

कॅलिफोर्निया : जागतिक महासत्ता अमेरिकेत बंदूक संस्कृती मोठं आव्हान ठरताना दिसतेय. दिवसेंदिवस संपूर्ण देशभरात अनेक गोळीबाराच्या घटना समोर येताहेत. सोमवारी पहाटे कॅलिफोर्नियातील एका घरात घुसून काही बंदुकधारींनी अंदाधुंद गोळीबार केलाय. त्यातच सहा जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये सहा महिन्यांच्या बाळासह त्याच्या आईचाही समावेश आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी या हल्ल्याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हा टार्गेटेड हल्ला होता. या हल्ल्यात सामील असलेल्या टोळीचा अंमली पदार्थ किंवा अमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असण्याचा संशय आहे. सोमवारी पहाटे साडेतीन वाजता कॅलिफोर्नियाच्या जोक्विन व्हॅलीमधील टुलारे सॅन शहरातील एका घरावर दोघांनी हल्ला केला आणि अनेक गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात सहा जणांनी आपला जीव गमावलाय.

पोलिसांनी सांगितलं की, सकाळी ज्या घरात हल्ला झाला त्यांच्या शेजारच्या व्यक्तीचा फोन आला. माहिती मिळताच सात मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस पोहोचेपर्यंत आरोपी पळून गेले. मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात तिथे पडले होते.

आम्हाला घटनास्थळी सहा मृतदेह सापडले, ही घटना अत्यंत अत्यंत दुःखद आहे. घटनास्थळावरून सहा महिन्यांच्या मुलाचं आणि त्याच्या आईचा मृतदेह आढळला. दोघांच्या डोक्यात गोळी लागल्यामुळं त्यांचा मृत्यू झालाय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube