स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर गोळीबार, संशयित पोलिसाला घेतलं ताब्यात

स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर गोळीबार, संशयित पोलिसाला घेतलं ताब्यात

Slovak PM Robert Fico Shot : स्लोवाकियाचे लोकप्रिय पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर आज गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज दुपारी 1 वाजता घडली. हल्लेखोरांनी फिको यांच्यावर चार गोळ्या झाडल्या आहेत. यामध्ये फिको गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

गंभीर जखमी

स्लोवाकियाच्या राजधानीपासून साधारण 150 किलोमीटर उत्तर-पूर्व हँडलोवा शहरातील हाऊस ऑफ कल्चरच्या बाहेर चार गोळ्या झाडण्यात आल्या. यामधील एक गोळी फिको यांच्या पोटात लागली आहे. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. येथे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांची समर्थकांसोबत एक बैठक सुरु होती.

 

देशभरात खळबळ

या गोळीबार प्रकरणात एक संशयित पोलिसाला ताब्यात घेतलं आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ सील केलं आहे. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली असून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरु केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज