Video : शिकारीसाठी आलेल्या बिबट्याला माकडांनी केला चितपट; थरारक व्हिडीओ आला समोर

Leopard Attack Baboons

Leopard Attacked Baboons Video : दक्षिण आफ्रिकेतील एका दुर्गम भागामध्ये माकडांनी (बबून वानर) एकीचे बळ दाखवून दिले आहे. 40 ते 50 माकडांनी मिळून एका बिबट्यावर हल्ला केला आहे. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? पण हे खरं आहे. घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

न्यायाधीशांच्या घरात शस्त्रांचा साठा; पत्नीची गोळ्या झाडून हत्या

या व्हिडीओमध्ये एक बिबट्या रस्त्याच्या बाजूने एका माकडावर नजर ठेवून शिकार करण्याच्या मनसुब्याने त्याचा पाठलाग करतो. बिबट्या शिकार करण्यासाठी जसा माकडाच्या पाठिमागे धावायला सुरुवात करतो, तसे पुढे असलेली 40 ते 50 माकडं मिळून त्या बिबट्याचा प्रतिकार करण्यासाठी पुढे येतात, त्यामुळे एकट्या बिबट्याला माकडांनी चांगलाच धुतला.

एवढ्या सगळ्या माकडांच्या हल्ल्यात बिबट्याला त्या ठिकाणाहून पळून जाण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय दिसला नाही. आणि बिबट्याने माकडांसमोर हार माणून त्या ठिकाणाहून धूम ठोकली. त्यामुळे आता माकडांनी एकीचं बळ दाखवून दिलं आहे. हा व्हिडीओ एका वाटसरुने आपल्या कॅमेरामध्ये कैद केला आहे.

Sharad Pawar : फडणवीसांचा फेमस डायलॉग उच्चारत पवारांनी सांगितलं PM मोदींचं भवितव्य

हा व्हिडिओ 15 ऑगस्टला सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. यूट्यूबवर आतापर्यंत 200,000 हून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर अनेकांनी या व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत.

Tags

follow us