स्पेनचा ऐतिहासिक निर्णय ! मासिक पाळीच्या काळात महिलांना मिळणार हक्काची सुट्टी

स्पेनचा ऐतिहासिक निर्णय ! मासिक पाळीच्या काळात महिलांना मिळणार हक्काची सुट्टी

स्पेन : प्रत्येक स्त्रीला दर २७ ते ३० दिवसांनी मासिक पाळी येत असते. वयाच्या १२-१३ व्या वर्षी सुरु झालेले मासिक पाळीचे चक्र वयवर्ष ४५ ते ५० झाल्यावर थांबते. (Spain menstrual leave law) या काळात स्त्रियांना खूप त्रास सहन करावा लागतो. (sick leave) यामुळे ठराविक दिवसात महिलांना विश्रांतीची गरज असते. (Spain) अगोदर घरांमध्ये महिलांना या काळात आराम करण्याची सोय असे. परंतु आता हळूहळू काळ बदलला आहे. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करु लागल्या आहेत, ऑफिसला जाऊ लागल्या आहेत.

मासिक पाळीच्या ४- ५ दिवसात महिलांना प्रचंड वेदना होत असतात. अनेकवेळा यांचा परिणाम त्यांच्या कामावर किंवा वैयक्तिक आयुष्यावर देखील होत असतो. या काळात त्यांना काम करत असताना खूपच ताण सहन करावा लागतो. या संदर्भामध्ये स्पेन या देशाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. स्पेनच्या संसदेत मंजूर झालेल्या कायद्यानुसार, त्या देशात महिलांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये रजा घेता येणार आहे. या कालावधीमध्ये पगारी रजा देण्याचा निर्णय तेथे घेण्यात आला.

अंजीर खाल्ल्यास शरीराला होतात हे फायदे

स्पेनच्या संसदेमध्ये या कायद्याच्या ठरावाला १८५ पैकी १५४ मते मिळाली. हा ठराव मंजूर झाल्यावर मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी देणाऱ्या मोजक्या देशात स्पेनचा समावेश झाला. तसेच असा ऐतिहासिक निर्णय घेणारा स्पेन हा पहिला युरोपियन देश बनला आहे. जपान, इंडोनेशिया आणि झांबिया अशा काही देशात या मासिक पाळीच्या सुट्टी संबंधात कायदे फार अगोदर तयार करण्यात आले आहेत. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे मंत्री इरेन मोंटेरो यांनी म्हटले आहे. या घेतलेल्या निर्णयामुळे जगभरात स्पेनचे कौतुक होत आहे.

दरम्यान मासिक पाळीच्या काळात महिलांना पगारी रजा देण्याच्या ठरावाला स्पेनमधील काही संघटनांनी विरोध दर्शवला आहे. UGT (Unión General de Trabajadores) ही तेथील सर्वात मोठी कामगार संघटना आहे. या संघटनेने या कायद्याचा विरोध केला. या निर्णयाने कामाच्या ठिकाणी महिलांची प्रतिमा मलीन होऊ शकते असे मत या संघटनेने मांडले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube