अंजीर खाल्ल्यास शरीराला होतात हे फायदे
मुंबई : धावपळीच्या या जीवनात पुरुषांच्या जबाबदाऱ्यामध्ये वाढ होत असते. वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे आपण कधी कधी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. यासाठी निरोगी आहार घेणे फार महत्वाचे आहे, अन्यथा पुरुषांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. म्हणूनच पुरुषांनी दररोज अंजीर खावीत यामुळे शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. अंजीर खाल्ल्याने पुरुषांना काय फायदे होतात हे आज आपण जाणून घेऊ
बद्धकोष्ठतेपासून मिळेल आराम : फळे हे शरीरासाठी आवश्यक असतात, यातच अंजीर हे एक असे फळ आहे जे फायबरचा समृद्ध स्रोत मानले जाते. याचे नियमित सेवन केल्याने अपचनाची समस्या दूर होते. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी अंजीर खाणे आवश्यक आहे.
वेट लॉससाठी : अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने आणि त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि ते खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही, कमी आहार घेतल्याने वजन हळूहळू कमी होऊ लागते. यामुळे अंजिराचे सेवन करावे.
हृदयरोगापासून बचाव : भारतात हृदयविकाराने ग्रस्त लोकांची संख्या खूप जास्त आहे, यामध्ये पुरुषही मोठ्या संख्येने आहेत. पुरुष अनेकदा कामाच्या निमित्ताने घराबाहेर राहतात आणि जास्त तेलकट पदार्थ खातात, अशावेळी उच्च कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असलेले अंजीर खाल्ल्याने हृदय निरोगी राहते कारण ते रक्तदाब नियंत्रित ठेवते.
अंजीर खाण्याचे अनेक प्रकार आहेत. हे कच्चे आणि शिजवलेले सेवन केले जाऊ शकते. मात्र, ते कोरडे करून सुक्या मेव्यासारखे खाण्याचा ट्रेंड आहे. जर पुरुषांना या फळाचा जास्तीत जास्त फायदा मिळवायचा असेल तर अंजीर रात्री पाण्यात भिजवून ठेवावे आणि सकाळी उठून ते रिकाम्या पोटी खावे. काही लोक रात्री झोपण्यापूर्वी ते दुधात मिसळून पितात.