मोठी बातमी! होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारी जहाजांसाठी पूर्णपणे खुली; इराणचा महत्त्वपूर्ण निर्णय

इराणने घेतलेल्या या निर्णयामुळे संपूर्ण जगाला मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे.

News Photo   2026 04 17T214504.923

अमेरिका आणि इराणमध्ये 28 फेब्रुवारी पासून (War) युद्धाला सुरुवात झाली होती. हे युद्ध तब्बल 39 दिवस चाललं, अखेर 40 व्या दिवशी अमेरिका आणि इराणकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान युद्धकाळात इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज जहाजांसाठी बंद केल्यानं संपूर्ण जगभरात मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं होतं. जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज आहे.

आता इराणने आता संपूर्ण जगासाठी पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ होर्मूज सुरू केला आहे, इराणचे परराष्ट्र मंत्री सैय्यद अब्बास अराघची यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत घोषणा केली आहे. इराणने घेतलेल्या या निर्णयामुळे संपूर्ण जगाला मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे.

इराणसोबत चर्चा निष्फळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन

युद्धकाळामध्ये इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला होता. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद झाल्यामुळे जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं होतं. याचा भारताला देखील मोठा फटका बसला होता. देशात एलपीजी सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता.

कच्च्या तेलाचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले होते. मात्र आता स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा एकदा सुरू झाल्यामुळे कच्च्या तेलाचे दर नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. तसेच कच्चे तेल आणि गॅसचा तुटवडा देखील दूर होणार असून पुन्हा एकदा परिस्थिती पूर्वपदावर येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Tags

follow us