अमेरिका अन् इराणमधील युद्धसंघर्ष टोकाला; इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई मारले गेल्याचा दावा
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई एका कारवाईत मारले गेल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्याने जगाची झोप उडाली आहे.
इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यानंतर आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Trump) यांनी अत्यंत खळबळजनक दावा केला. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई एका कारवाईत मारले गेल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्याने जगाची झोप उडाली आहे. काल इराणवर इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून मोठा हल्ला केला. यानंतर भडकलेल्या इराननेही अमेरिकेचे लष्कर तळ असलेल्या 8 देशांवर थेट हल्ला केला.
याचबरोबर असंख्य क्षेपणास्त्र इस्त्रायलवर डांगली. इराणने स्पष्ट केलं की, तुम्ही हे युद्ध सुरू केलं आम्ही संपवणार. इराण आणि अमेरिकेतील तणाव प्रचंड वाढला आहे. इस्त्रायलमधील नागरिकांनाही बंकरमध्ये ठेवण्यात आलं. इराणमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आलं. इस्त्रायलकडून एअर डिफेन्स सिस्टिम अॅक्टीव्ह करण्यात आलंय. इराणची सुरक्षा व्यवस्था नष्ट करण्यासाठीच ही हल्ले केली जात असल्याचा दावा इराणकडून केला जात आहे.
अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्याने जग हादरलं; इराणच्या संरक्षणमंत्र्यासह कमांडरला संपवलं
तीन देशात सुरू झालेल्या युद्धाच्या झळा आतापर्यंत थेटपणे 8 देशांना बसल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई हल्ल्यात ठार झाल्याचा दावा केला. त्यानंतर इराणने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई सुरक्षित आहेत, त्यांना ठार केल्याच्या बातम्या खोट्या आहेत. मात्र, त्यानंतरही इराणी मिडियाकडून सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूची बातमी चालवली जात आहे.
आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनाची बातमी इराणी मीडियाकडून चालवली जात आहे. फक्त आयातुल्ला अली खामेनेई हेच नाही तर त्यांचा जावई आणि मुलगीही एका हल्ल्यात ठार झाल्याचा दावा केला जात आहे. इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. मात्र, यावर अजूनही सरकारकडून काही भाष्य करण्यात आले नाही. उलट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अयातुल्ला खमेनी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले
आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनाच्या बातमीने जगात खळबळ उडाली. चीन आणि रशियाने थेट अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध केला. मागील काही दिवसांपासून सतत अमेरिकेकडून इराणला धमकी दिली जात होती. मात्र, चर्चा सुरूच असतानाच अमेरिकेने हल्ला केल्याचा दावा इराणकडून करण्यात आला. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला.
