नवा फतवा काढत Elon Musk चा युजर्संना दणका, कंटेट वाचण्यासाठी मोजावे लागणार पैसे

नवा फतवा काढत Elon Musk चा युजर्संना दणका, कंटेट वाचण्यासाठी मोजावे लागणार पैसे

Twitter News Policy : Twitter will now allow publishers to charge per article : मागील काही काळात सोशल मीडियातील मोठी कंपनी ट्विटरविषयी (Twitter) जोरदार चर्चा रंगल्या आहेत. ट्विटर सतत त्यांच्या पॉलिसीमध्ये (Twitter Policy) काही ना काही बदल करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आताही ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क (Elon Musk is the new owner of Twitter) यांनी अजून एक फतवा काढला आहे. त्यानुसार, ट्विटर आता पुढील महिन्यापासून प्रकाशकांना एक क्लिकवर प्रति लेख युजर्सकडून शुल्क आकारण्याची परवानगी देईल, अशी माहिती ट्विरटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी दिली आहे. यामुळं ट्विटवर आता युजर्संना कंटेट वाचणे अवघड होणार आहे.

ट्विटरवर जर तुम्हाला कंटेट वाचायचा असेल तर त्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. माध्यम संस्था आणि लोकांसाठी हा विजय आहे. अशा आशयाचं ट्विट मस्क यांनी केलं. त्यांनी लिहिलं की, ज्या युजर्सकडे ट्विटरचे सब्सक्रिप्शन नसेल त्यांनी ट्विटरवर लेख वाचण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागले. तसेच पुढच्या महिन्यापासून ही सेवा प्रकाशकांसाठी सुरू करेल, असं देखील मस्क यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. थोडक्यात काय तर आता मीडिया प्रकाशकांना युझरकडून पैसे आकारण्याची परवानगी देण्यात आली. यातून मस्क यांच्या ट्विटर देखील पैसा मिळणार आहे.

तसचे कॉन्टेट क्रिएटर्स आता त्यांच्या मोठ्या व्हिडिओसाठी आणि लेखासाठी पैसे आकारू शकतात, असे देखील मस्क यांनी ट्विट करत सांगितले.

ट्विटरमध्ये आतापर्यंत झालेले बदल
ऑक्टोबर महिन्यात ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर मस्क यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले. ट्विटरच्यचा धोरणांत मस्क यांनी बदल केले आहेत.

एप्रिल महिन्याच्या सुरूवातील ट्विटरच्या एका पॉलिसीमध्ये सांगितले होते की, ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ट्विटरवर प्रतिबंधित करण्यात येईल. हा नियम हिंसक तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ट्वीटरवर लागू केला जाईल, असे देखील ट्विटरकडून सांगण्यात आले होते.

गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेऊ, अजितदादांनाही.. अब्दुल सत्तारांची टोलेबाजी !

तसेच ट्विटरने नामांकित राजकीय नेते, अभिनेते, खेळाडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक काढले होते. ब्लू टिकसाठी सुध्दा ट्विटरने शुल्क आकारण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळं ज्या लोकांनी ब्लू टिकसाठी पैसे दिले त्यांनाच ट्विटरचे ब्लू टिक मिळाले. पण, त्यानंतर एक मिलियनपेक्षआ अधिक फॉलोअर्स असणाऱ्या लोकांसाठी ब्लू टिक फ्रि केले.

मस्क यांनी ब्लू टिकसाठी पैसे आकारणी सुरू केली. अनेक ठिकाणचे ऑफीस बंद केले. लाखो कर्मचाऱ्यांना कामावरून घरी काढले. ट्विटरचा खर्च कमी करण्यासाठी अनेक बदल मस्क यांनी केले. तरी कमाईचे गणित मात्र, चुकल्यानं आता मस्क यांनी पैसे जमा करण्यासाठी हा नवीन फतवा शोधला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube