अमेरिकेकडून युद्धविरामात वाढ! पण पराभूतांना अटी-शर्थींचा अधिकार नाही म्हणत इराणने फेटाळली शस्त्रसंधी

US extends ceasefire अमेरिका इराण यांच्यातील युद्धविराम आणखी वाढवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सहमती दिली आहे.

US Extends Ceasefire

US extends ceasefire But Iran rejects truce, saying losers have no right to terms and conditions : अमेरिका इराण यांच्यातील युद्धविराम आणखी वाढवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सहमती दिली आहे. मात्र अमेरिकेकडून होर्मुजमधील नाकेबंदी कायम ठेवण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे मात्र इराणने अमेरिकेवर टीका करत ही शस्त्र संधी फेटाळली आहे.

नेमकं काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

इराणच्या सरकारमध्ये मोठी फूट पडलेली आहे. हे होणं अपेक्षितच होतं. त्याचबरोबर पाकिस्तानचे फिल्ड मार्शल असीम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलेल्या विनंतीवरून आम्ही इराणवरील हल्ले पुन्हा काही दिवसांसाठी थांबवत आहोत. हे हल्ले तोपर्यंत थांबवण्यात आले आहे. जोपर्यंत त्यांचे प्रतिनिधी एकमताने एखादा प्रस्ताव घेऊन येत नाहीत.

मात्र दुसरीकडे याच ट्वीटमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुजमधील नाकेबंदी मात्र कायम ठेवली आहे. याबाबत ते म्हणाले होर्मुजमधील नाकेबंदी कायम ठेवावी आणि तर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असावं असे निर्देश मी माझ्या लष्कराला दिलेले आहेत.

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत दुर्मिळ आणि भाग्याचा दिवस! कोणत्या राशीसाठी कसा आहे आजचा दिवस?

दरम्यान इस्लामाबादमध्ये अयशस्वी झालेल्या चर्चेच्या प्रस्तावानंतर इराण अद्यापही अमेरिकेशी चर्चेला तयार नाही. त्यामुळे अमेरिकेने ही एकतर्फी शस्त्रसंधी वाढवली आहे. मात्र ही शस्त्रसंधी इराणने फेटाळून लावली आहे. यावर इराणच्या संसदेच्या अध्यक्षांचे सल्लागार मेहदी मोहम्मदी यांनी अमेरिकेवर टीका केली आहे. ते म्हणाले की, पराभूतांना अटी शर्ती ठेवण्याचा अधिकार नाही.

Rahuri By-Election-आकर्मचाऱ्यांचे हेलपाटे टळणार ! मतदान केंद्रावरच मिळणार ईव्हीएम

दुसरीकडे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला या युद्धविराम वाढवण्याचे श्रेय दिल्याने पाकिस्तानने देखील ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. पाकिस्तान म्हणाला आहे की, युद्धविराम वाढवण्यासाठी पाकिस्तानची विनंती मान्य केल्याबद्दल आणि त्यामुळे सुरू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांना पुढे येण्याची संधी दिल्याबद्दल ट्रम्प यांचे आभार मानतो.

follow us