US KC-135 Refuelling Aircraft : अमेरिकेला मोठा धक्का, इराकमध्ये कोसळलं लष्करी विमान KC-135

US KC-135 Refuelling Aircraft  : अमेरिका, इस्त्रायल आणि इराक दरम्यान गेल्या 14 दिवसांपासून युद्ध सुरू असून अमेरिका आणि इस्रायल संयुक्तपणे

US KC 135 Refuelling Aircraft

US KC-135 Refuelling Aircraft  : अमेरिका, इस्त्रायल आणि इराक दरम्यान गेल्या 14 दिवसांपासून युद्ध सुरू असून अमेरिका आणि इस्रायल संयुक्तपणे इराणवर हल्ले करत आहे. तर इराण देखील प्रत्युत्तर देत इस्त्रायल आणि अरब देशात असणाऱ्या अमरेकी तळांवर जोरदार हल्ले करत आहे. तर आता या युद्धात अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे.

अमेरिकेचा लष्करी विमान KC-135 स्ट्रॅटोटँकर (US KC-135 Refuelling Aircraft) हे इंधन भरणा विमान इराकमध्ये कोसळले आहे. याबाबत अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने माहिती दिली आहे. ऑपरेशन एपिक फ्युरी’ (Operation Epic Fury) दरम्यान मित्र राष्ट्रांच्या हवाई हद्दीत ही घटना घडली. या घटनेत दोन विमानांचा समावेश होता. त्यापैकी एक विमान पश्चिम इराकमध्ये (Iraq) कोसळले तर दुसरे विमान सुखरूप उतरले. सध्या बचावकार्य सुरू आहे. ही घटना शत्रूच्या किंवा मित्र राष्ट्रांच्या गोळीबाराने घडलेली नसल्याची माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून (U.S. Central Command) देण्यात आली आहे.

तर दुसरीकडे गेल्या 14 दिवसांपासून सुरु असणाऱ्या या युद्धात अनेकांचा मृत्यू झाला असून 17 हजार पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहे. त्यामुळे युद्ध कधी संपणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. या युद्धामुळे भारतासह जगातील अनेक देशात तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. एकाच वेळी अनेक देशात तेल पुरवठा विस्कळीत झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम दिसून येत आहे.

तर भारतातील देखील अनेक शहरांमध्ये आता गॅस खरेदीसाठी मोठमोठ्या रांगा दिसून येत आहे. भारतात आवश्यकतेनुसार तेल पुरवठा असल्याची माहिती भारत सरकारकडून देण्यात आली आहे मात्र तरी देखील गॅस खरेदीसाठी आता देशात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.

follow us