US Strikes In Iran Undermine: २२ जूनच्या पहाटे २:३० वाजता अमेरिकेनं इराणच्या तीन सर्वात महत्त्वाच्या अणुस्थळांवर—फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान— हवाई हल्ले केले. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर प्रथमच अमेरिकेने थेट इराणी भूमीवर अशी सैनिकी कारवाई केली. या घटनेमुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली. अमेरिकेच्या या कारवाईमुळे इराणच्या अणुकार्यक्रमावर मोठा परिणाम होईल का, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. […]
इस्रायल आणि इराणमधील युद्ध थांबवण्याची भाषा करणारे अमेरिका राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आता युद्धात उडी घेतली आहे.