“माझ्या बाबांचा पगार वाढवू शकता का?…” सोशल मीडियावर बाप-लेकीच्या नात्याची हळवी गोष्ट व्हायरल!

Viral News कर्मचाऱ्याच्या फोनवरून कॉल आल्याने काहीतरी अघटित घडलंय की काय, या चिंतेने बॉसने फोन उचलला आणि विचारलं...

  • Written By: Published:
"माझ्या बाबांचा पगार वाढवू शकता का?..." सोशल मीडियावर बाप-लेकीच्या नात्याची हळवी गोष्ट व्हायरल!

Can you raise my dad’s salary? A 9-year-old’s innocent plea melts hearts :  कधीकधी जग जिंकण्यासाठी रणांगणावर जाण्याची गरज नसते, आपल्या लेकीच्या नजरेतलं ‘हिरो’ असणंही पुरेसं असतं. सध्या इंटरनेटवर एका 9 वर्षांच्या चिमुकलीचा आणि तिच्या वडिलांच्या बॉसचा असाच एक संवाद व्हायरल झाला आहे, जो वाचताना तुमचेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. ही गोष्ट आहे एका बापाच्या ओढग्रस्तीची आणि लेकीच्या निरागस विश्वासाची.

पुण्याच्या नसरापूरपासून हैदराबादपर्यंत नराधमांचा सुळसुळाट; लेडी ‘सिंघम’ ने 3 तासांत 40 लांडगे ठेचले!

तो एक अनावधानाने लागलेला फोन…

एका 9 वर्षांच्या चिमुकलीने सहज म्हणून आपल्या बाबांचा फोन हातात घेतला आणि एक नंबर डायल केला. योगायोगाने तो फोन थेट तिच्या वडिलांच्या बॉसला लागला. कर्मचाऱ्याच्या फोनवरून कॉल आल्याने काहीतरी अघटित घडलंय की काय, या चिंतेने बॉसने फोन उचलला आणि विचारलं, “हॅलो, सगळं ठीक आहे ना? कोण बोलतंय?”

पलीकडून उमटला काळजाला भिडणारा आवाज…

त्या चिमुकलीला माहित नव्हतं की, ती कुणाशी बोलत आहे. तिने मोठ्या निरागसतेने संवाद सुरू केला.

मुलगी: “हॅलो, माझ्या बाबांचा फोन आहे.

बॉस: “हो, पण तू कोण? घरी काही अडचण आहे का?”

मुलगी: (किंचित थबकत)

“काका… तुम्ही माझ्या बाबांचा पगार थोडा वाढवू शकाल का? त्यांना मला एक गिफ्ट द्यायचं आहे, पण त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत.” तिचे हे शब्द कानावर पडताच, कार्यालयात कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जाणारे ते ‘बॉस’ क्षणभर निशब्द झाले. ज्या कर्मचाऱ्याला ते रोज कामाच्या चष्म्यातून पाहत होते, त्याच्या आयुष्यातील ‘बाप’ म्हणून असलेला संघर्ष एका सेकंदात त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. काही क्षण शांततेत गेले आणि फोन कट झाला. Can you raise my dad’s salary? A 9-year-old’s innocent plea melts hearts

Jabalpur Cruise Accident : ‘लाईफ’ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जॅकेटचा इतिहास काय?

बापाचे पाणावलेले डोळे अन् लेकीचा विश्वास

ज्यावेळी हे संभाषण सुरू होतं, तेव्हा या चिमुकलीचे वडील बाजूलाच उभे होते. आपल्या लेकीने काय केलंय हे पाहून सुरुवातीला त्यांना संकोच वाटला, कदाचित भीतीही वाटली असेल. पण जेव्हा त्यांनी आपल्या लेकीच्या निरागस डोळ्यांकडे पाहिलं, तेव्हा त्यांचा संताप विरघळून गेला. त्यांना जाणीव झाली की, आपली मुलगी आपल्याकडे एक ‘कमी कमवणारा माणूस’ म्हणून पाहत नाहीये, तर ती आपल्याकडे अशा एका ‘नायका’सारखी पाहतेय जो तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करतोय. त्या क्षणी त्या वडिलांच्या मनात एकच विचार आला की, “मला हवा असलेला नायक मी नाही, पण ज्याची तिला गरज आहे, तो ‘हिरो’ मी नक्कीच आहे!”

यश पैशात नाही, विश्वासात असतं!

सायमन इंगारी यांनी शेअर केलेली ही हृदयस्पर्शी गोष्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, आजच्या धावपळीच्या युगात खूप काही शिकवून जातीये. आपण आपल्या करिअरमध्ये किती यशस्वी आहोत, बँक बॅलन्स किती आहे, यापेक्षा आपण आपल्या मुलांसाठी किती ‘उपलब्ध’ आहोत, हे महत्त्वाचे असते “हिरो होण्यासाठी परिपूर्ण असण्याची किंवा श्रीमंत असण्याची गरज नसते; फक्त आपल्या मुलांच्या नजरेतील विश्वास सार्थ ठरवणे पुरेसे असते.” या निरागस कथेने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, वडिलांसाठी त्यांचं घर हेच त्यांचं सर्वात मोठं साम्राज्य असतं आणि मुलांच्या नजरेतलं कौतुक हेच त्यांचे खरे ‘इन्क्रीमेंट’ असते. ही गोष्ट सध्या प्रत्येकाच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर फिरत असून, बाप-लेकीच्या नात्याची एक नवी व्याख्या मांडत आहे.

follow us