China : चीनमुळे जगभरातील शेअर बाजार संकटात; नेमकं घडलं तरी काय?

China : चीनमुळे जगभरातील शेअर बाजार संकटात; नेमकं घडलं तरी काय?

China : सध्या चीनच्या (China) अर्थव्यवस्थेसमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. त्याचा परिणाम जगभरातील स्टॉक मार्केटवर त्याचा विपरीत परिणाम होताना दिसत आहेत. एक काळ असा होता की चीनी कंपन्यांतील गुंतवणूक चांगला परतावा देणारी ठरत होती. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. चीनचे रिअल इस्टेट मार्केट संकटात सापडले आहे. या संकटामुळे अन्य क्षेत्रांच्याही अडचणी वाढू शकतात. सध्या चीनच्या कंपन्यांच्या शेअर्सची विक्री होताना दिसत आहे. मात्र, युरोप,अमेरिका आणि आशियाई देशांतील कंपन्यांवरही दबाव येताना दिसत आहे ज्यामध्ये चीनच्या मागणीचा मोठा वाटा आहे.

मोदी सरकारचा इलेक्शन प्लॅन! महागाई अन् नाराजी टाळण्यासाठी रशियाकडून गहू खरेदी

Caterpillar Inc आणि Dupont de Nemours Inc ने आगामी काळतील संकटांचे संकेत दिले आहेत. चीनच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा अंदाजात घट होत आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित असणाऱ्या जागतिक कंपन्यांना ट्रॅक करणारा MSCI Index या महिन्यात दहा टक्क्यांनी घसरला आहे. बँक ऑफ अमेरिकेच्या रणनीतीकारांच्या मते जर चीनमध्ये संकटे वाढली तर अमेरिकी स्टॉक्समध्ये आणखी चार टक्के घट होण्याची शक्यता आहे.

Rayliant Global Advisors चे अध्यक्ष जेसन हसू म्हणाले, जग कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने चीनशी जोडले गेले आहे. जगातील मोठ्या कंपन्या एक तर चीनला उत्पादने विकतात किंवा त्यांच्याकडील उत्पादने घेतात. या कंपन्यांना आता पुढील वर्षातील उत्पन्नातील अंदाजात घट करावी लागणार आहे. गुंतवणूकदार, उद्योग आणि ग्राहकांचा चीनच्या अर्थव्यवस्थेवरील विश्वास कमी होत चालला आहे. याचे कारण म्हणजे मागील आठवड्यात आलेल्या काही बातम्या आहेत. Zhongzhu Enterprise Group Co या कंपनीने हजारो ग्राहकांना पेमेंट रोखले आहे. रिअल इस्टेट कंपनी Country Garden Holdings Co. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

Video : शिकारीसाठी आलेल्या बिबट्याला माकडांनी केला चितपट; थरारक व्हिडीओ आला समोर

सध्या हाँगकाँग आणि चीनच्या स्टॉक मार्केट्सचे प्रमुख सूचकांक नोव्हेंबर 2022 नंतर प्रथमच अत्यंत कमी झाले आहेत. जागतिक पुरवठा साखळीत चीनची स्थिती पाहता युरोप आणि अमेरिकेतही गुंतवणकीवर परिणाम होताना दिसत आहे. या संकटातून लवकर तोडगा निघाला नाही तर जगभरातच संकटे आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube