पुणे पोलिसांची मोठी कारवाई! बुधवार पेठेत ११ बांगलादेशी महिलांना अटक, प्रकरण काय?

पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत रात्री सर्च मोहीम घेतली. फरासखाना पोलीस स्थानकाच्या हद्दीत खडक पोलिसांची ही कारवाई केली आहे.

  • Written By: Published:
Pune Budhwar Peth

पुण्यातील बुधवार पेठेतून आज बुधवार ( दि, 18 फेब्रुवारी)रोजी ११ बांग्लादेशी महिलांवर (Pune) पोलिसांनी अटकेची कारवाई केली. या बांगलादेशी महिला फेक आधारकार्ड आणि रेशनिंग कार्डच्या आधारे येथं रहात होत्या. तसंच, शरीरविक्रय व्यवसाय करीत असल्याचं समोर आलं आहे. बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा सध्या गाजत असताना ही कारवाई झाल्याने आता नवा विषय समोर आला आहे.

या भागात बांगलादेशी महिला वेश्या व्यवसाय करतात अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे बुधवार पेठेतील रेड लाईट एरियातून या ११ बांगलादेशी महिलांवर कारवाई झाल्याचं पोलीस उपायुक्त कृषीकेश रावळे यांनी सांगितलं. यामध्ये आम्ही एकूण २२ महिलांवर कारवाई केली असून त्यातील ११ महिला या बांगलादेशी असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पोलीस ठाण्यातच तरुणीचा सौदा; महिला हवालदाराच्या निलंबनानंतर पोलिसांचं बुधवार पेठेत कोम्बिंग ऑपरेशन

या महिला काही महिन्यांपासून शहरात बेकायदेशीरपणे रहात होत्या हे उघडकीस आलं आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे अशीही माहितीही पोलिसांनी दिली. तसंच, पुण्यातील बांग्लादेशी नागरिकांवरील ही कारवाई झाल्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. सातत्याने बांग्लादेशी महिला सापडत असल्याने आज स्वतः पोलीस आयुक्त फरसखाना पोलीस ठाण्यात दाखल झाले.

पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत रात्री सर्च मोहीम घेतली. फरासखाना पोलीस स्थानकाच्या हद्दीत खडक पोलिसांची ही कारवाई केली आहे. पोलिसांनी बुधवार पेठेतून ११ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले आहे. या सर्व महिला बुधवार पेठ परिसरात वेश्याव्यवसाय करत होत्या. या सर्व महिलांना ताब्यात घेतले असून आता त्यांना मायदेशी पाठवण्यासंदर्भात पुढील कारवाई सुरूअसल्याची पोलिसांनी म्हटले आहे.

follow us