विधानसभेच्या जागा 650 होणार! 132 व्या घटनादुरुस्ती विधेयकावर अमित शाहांचं मोठं विधान, महिला आरक्षणालाही बळ.

Delimitation Bill : विधानसभा सदस्यसंख्येची मर्यादा 500 वरुन 650 करण्याचा प्रस्ताव, महिला आरक्षण, प्रतिनिधित्व वाढवण्यावर अमित शाहांचा भर.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 28T161948.840

Delimitation Bill : केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (BJP) यांच्या नेतृत्वाखाली 132 व्या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली असून, हा निर्णय देशातील लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. या विधेयकामुळे देशातील सर्व राज्यांमध्ये जनप्रतिनिधींची संख्या वाढण्यास मदत होणार असून, शासनव्यवस्था सर्वसामान्य जनतेच्या अधिक जवळ पोहोचेल. लोकप्रतिनिधित्व वाढवण्याच्या माध्यमातून स्थानिक प्रश्नांना राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय निर्णयप्रक्रियेत अधिक महत्त्व मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

या विधेयकातील महत्त्वाच्या तरतुदीनुसार संविधानातील अनुच्छेद 170(1) मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे राज्यांच्या विधानसभेतील सदस्यसंख्येची कमाल मर्यादा सध्याच्या 500 वरुन सुमारे 650 पर्यंत वाढवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. उत्तर प्रदेशचे विभाजन न करता विधानसभेतील प्रतिनिधित्व वाढवता येईल. त्यामुळे राज्यातील विविध भागांना अधिक लोकप्रतिनिधी मिळतील आणि स्थानिक प्रश्नांना सभागृहात प्रभावीपणे मांडण्याची संधी उपलब्ध होईल, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्यांना कळतं, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा खेळ राज ठाकरेंनी आधीच ओळखला होता?

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनेही हे विधेयक महत्त्वाचे ठरणार आहे. महिलांसाठी एक तृतीयांश आरक्षणाच्या तरतुदीमुळे उत्तर प्रदेशातील महिलांना राजकीय क्षेत्रात आतापर्यंतचे सर्वाधिक प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. महिलांचा निर्णयप्रक्रियेतील सहभाग वाढल्याने स्थानिक विकासाच्या प्रश्नांनाही अधिक महत्त्व मिळेल. तसेच अधिक लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या गरजा आणि समस्या विधानसभेत मांडू शकतील, असे त्यांनी नमूद केले आहे.

अधिक लोकप्रतिनिधी उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक गरजांनुसार विकास योजना तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे अधिक प्रभावी होईल. या निर्णयामुळे उत्तर प्रदेशातील सुशासन आणि जनसहभागाला नवी ताकद मिळेल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. तसेच राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी या ऐतिहासिक विधेयकाचे स्वागत करून त्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे.

Tags

follow us