भाजपसोबतचं कथित डील अन् दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण; पवार निवृत्तीचा पर्याय निवडणार?
Sharad Pawar retirement शरद पवार हे भाजपसोबत जाणार या चर्चांदरम्यान पवार राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
An alleged deal with BJP and merger of both NCP will Pawar choose retirement : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? आणि शरद पवार हे भाजपसोबत जाणार का? याची. मात्र यामुळे शरद पवारांच्या पक्षाच्या विचारधारेवर पवारांच्या आतापर्यंतच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकतं. त्यामुळे यातील मध्यमार्ग निवडत पवार राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र निवृत्तीच का निवडतील याचे काही कारणं पुढील प्रमाणे सांगता येतील.
Gokul Milk : गोकुळ ‘अध्यादेशासाठी’ सरकारने मोजले तब्बल 80 लाख ; बंटी पाटील म्हणाले…
एकीकडे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरू आहे. शरद पवार हे भाजपसोबत जाणार याची. याला दुजोरा देणाऱ्या घटना आणि वक्तव्य वारंवार माध्यमांतून सोशल मिडीयातून समोर येत आहेत. यात आघाडीवर असतात त्या भाजपच्या डिलीमिटेशन बिलला पाठिंबा देणारी वक्तव्य करणाऱ्या सुप्रिया सुळे. यातून आता शरद पवार आणि सुप्रिया सुळेंबाबत एक मोठा दावा करण्यात आला आहे.
जेन्सेन हुआंगच्या कमबॅकला शेअर बाजाराची सलामी! Nvidia शेअर्स 36% उसळी!
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी केल्याचा दावा ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ने केला आहे. भाजपसोबत सुरू असलेल्या कथित बोलणीच्या पार्श्वभूमीवर हा दावा करण्यात आला आहे. या वृत्तानुसार, शरद पवार हे भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सामील होण्यासाठी बॅक-चॅनल बोलणी करत आहेत.
वंचितला भाजपची ‘बी टीम’ ठरवणारे शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर गप्प का? अंजली आंबेडकर संतापल्या
दुसरीकडे असेही बोलले जात आहे की, शरद पवारांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी आणि त्यांच्या पक्षाने एनडीएत सहभागी व्हावं यावर चर्चाा सुरू अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. मात्र दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण असो किंवा भाजपसोबत जाणं असो हे दोन्ही निर्णय पवार यांनी स्वत: न घेता ते सुळे आणि पक्षातील ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी घ्यावा अशीही चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. कारण येत्या 12 डिसेंबरला शरद पवार आपल्या वयाच्या 86 व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत. त्यामुळे या वयामध्ये पवारांनी आपला शाहू-फुले- आंबेडकरांचा पुरोगामी विचार सोडला, ते जातीयवादी भाजपसोबत गेले अशी टीका होईल त्यासाठी पवारांची निवृत्ती हा मध्यमार्ग ठरू शकतो.