‘वंदे मातरम्’च्या अवमानाचा आरोप, भालचंद्र मुणगेकरांना एशियाटिक सोसायटीची कारणे दाखवा नोटीस
प्रा. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांना राष्ट्रगीताचा कथित अवमान केल्याच्या आरोपावरून व्यवस्थापन समितीने करणे दाखवा नोटीस बजावली आहे.
Asiatic Society issues show-cause notice to Bhalchandra Mungekar : मुंबईतील दि एशियाटिक सोसायटीमध्ये वंदे मातरमवरून नवा वाद निर्माण झाला आहे. संस्थेचे विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे राज्यसभा सदस्य प्रा. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांना राष्ट्रगीताचा कथित अवमान केल्याच्या आरोपावरून व्यवस्थापन समितीने करणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुणगेकर यांनी आपल्या कृतीबद्दल बिनशर्त जाहीर माफी मागावी, अशी मागणी समितीने केली आहे. मात्र मुणगेकर यांनी माफी मागण्याची मागणी फेटाळून लावली असून, संस्थेच्या पत्राला उत्तर दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणावरून संस्थेतील वाद आता अधिक चर्चेत आला आहे.
26 सप्टेंबर रोजी एशियाटिक सोसायटीच्या व्यवस्थापन सामोटीची 222 वी बैठक झाली होती. या बैठकीच्या समारोपावेळी वंदे मातरमचे गाय सुरू असताना दोन कडव्यांनंतर मुणगेकर सभागृहातून बाहेर पडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी व्यवस्थापन समितीच्या दोन सदस्यांनी संस्थेकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारींवर विचार केल्यानंतर स्मॉटिने मुणगेकर यांच्या कृतीचा निषेध करणारा ठराव मंजूर केला. तसेच, त्यांनी तातडीने आणि कोणतीही अट न घालता जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. या ठरावाची प्रत 21 ऑक्टोबर रोजी मुणगेकर यांना पाठवण्यात आली होती.
अर्णब चक्रीवादळामुळे विमान आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम, अनेक गाड्या रद्द, प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन
व्यवस्थापन समितीने पाठवलेल्या नोटीसमध्ये मुणगेकर यांच्या कृतीमुळे त्यांनी भूषविलेल्या पदाची आणि एशियाटिक सोसायटीची प्रतिष्ठा मलिन झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकरणात माफी मागावी, अशी भूमिका समितीने घेतली आहे. दुसरीकडे, मुणगेकर यांनी संस्थेचे पत्र मिळाल्याचे आणि त्याला उत्तर पाठवल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, माफी मागण्याची मागणी मान्य केलेली नाही. त्यामुळे आता मुणगेकर यांच्या उत्तरावर व्यवस्थापन समिती काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.
एशियाटिक सोसायटीचे मानद सचिव विवेक गणपुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुणगेकर यांचे उत्तर संस्थेला मिळालेले आहे. हे उत्तर व्यवस्थापन समितीच्या पुढील बैठकीत सादर केले जाणार आहे. त्यानंतर समितीतील सदस्यांच्या चर्चेनुसार आणि सर्वानुमते पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणात पुढे कोणती भूमिका घेतली जाते, हे महत्वाचे ठरणार आहे.
karjat Tree Cutting : ‘भीमाशंकर’वरुन रान पेटणार, राज ठाकरे-मनोज जरांगेंची तोफ धडाडणार
दरम्यान, एशियाटिक सोसायटीच्या विश्वस्त मंडळ आणि व्यवस्थापन समितीमध्ये आधीपासूनच मतभेद असल्याचे सांगितले जाते. मुणगेकर हे काँग्रेसशी संबंधित आहेत, तर व्यवस्थापन समितीतील विनय सहस्रबुद्धे हे भाजपचे माजी खासदार आहेत. जुलैमध्ये झालेल्या संस्थेच्या निवडणुकीत एशियाटिक टुमारो गटाने व्यवस्थापन समितीच्या सर्व 19 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर संस्थेच्या कारभारात विश्वस्त मंडळ आणि व्यवस्थापन समिती यांच्यातील संबंध चर्चेत राहिले आहेत. आता ‘वंदे मातरम्’च्या कथित अवमानावरून निर्माण झालेल्या वादामुळे संस्थेतील अंतर्गत मतभेद पुन्हा समोर आले आहेत. प्राच्यविद्या आणि संशोधन क्षेत्रात महत्त्वाचे स्थान असलेल्या या संस्थेतील घडामोडींमुळे शैक्षणिक वर्तुळाचेही लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले आहे.