धक्कादायक! काँग्रेस नेत्याला गाढ झोपेतच घरात घुसून मारलं; थरारक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर

Karnataka Congress leader killed कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात एका तरूण काँग्रेस नेत्याला अज्ञातांनी थेट घरात घुसून संपवलं.

Congress

Karnataka Congress leader killed in sleep; CCTV footage shocking incident surfaced : कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही बातमी म्हणजे या ठिकाणी एका तरूण काँग्रेस नेत्याला अज्ञातांनी थेट घरात घुसून संपवलं. यावेळी हे नेते गाढ झोपेत असतानाच त्यांना संपवण्यात आलं असून या थरारक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे.

नेमकी घटना काय?

कर्नाटकातील धारवाड शहरातील हाशमीनगर भागामध्ये तरुण काँग्रेस नेते फिरोज पठाण हे राहतात. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांच्या घरामध्ये चार अज्ञात हल्लेखोर घुसले. त्यांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी यावर कारवाई सुरू केली आहे. मात्र मी हल्लेखोर सध्या फरार झाले असून याच घटनेची सीसीटीव्ही फुटेज येथे समोर आलं आहे.

महिलेचे चित्रीकरण करून ‘स्टिंग’चा दावा; पुण्यात पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल, आरोपीला मदत करणाऱ्यांवरही कारवाईची मागणी

तसेच ही प्राथमिक अंदाजानुसार ही हत्या जुन्या वादातून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून घेतला असून सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटवणे आणि त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ माजली आहे.

हत्तीच्या हल्ल्यात भाजप युवा नेत्याचा मृत्यू

झारखंड राज्यातील गुमला (BJP) जिल्हा येथे पिसाळलेल्या हत्तीच्या हल्ल्यात ३२ वर्षीय भाजप युवा नेते अनुप कुमार पांडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गावावर शोककळा पसरली आहे.

follow us