आधीच महागाईने हैराण, त्यात सीएनजी दरवाढीचा आणखी एक झटका! मुंबईत प्रतिकिलो दर 91.50 रुपयांवर

पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील गॅसच्या किमतींमध्ये झालेली वाढ यामुळे कंपनीच्या खरेदी खर्चात मोठी वाढ झाली आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 11 15T090145.329

CNG prices increase again in Mumbai : मुंबई आणि परिसरातील वाहनचालकांच्या खिशाला पुन्हा एकदा महागाईची झळ बसणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 1.50 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईत आता सीएनजीसाठी प्रतिकिलो 91.50 रुपये मोजावे लागणार आहेत. ही नवीन दरवाढ 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे.

आधीच वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या मुंबईकरांना या दरवाढीमुळे आणखी आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. विशेषतः सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनधारकांना या निर्णयाचा थेट फटका बसणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने या दरवाढीमागील कारणे स्पष्ट करत अधिकृत निवेदन जारी केले आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील गॅसच्या किमतींमध्ये झालेली वाढ यामुळे कंपनीच्या खरेदी खर्चात मोठी वाढ झाली आहे.

SBI ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी! स्टेट बँकेच्या सर्व्हरवर हॅकर्सचा मोठा हल्ला, 3.75 लाख रेकॉर्ड्स चोरीला

याशिवाय देशांतर्गत नैसर्गिक गॅसच्या पुरवठ्यात कपात झाल्याने कंपनीला महागड्या आयात केलेल्या रिगॅसिफाइड लिक्विफाइड नॅचरल गॅसवर अधिक अवलंबून राहावे लागत आहे. एकूण गॅस पुरवठ्यात आयात केलेल्या गॅसचा वाटा वाढल्याने खर्चात आणखी भर पडली आहे. हा वाढता खर्च काही प्रमाणात भरून काढण्यासाठी आणि ग्राहकांना गॅसचा अखंड पुरवठा सुरू ठेवण्यासाठी सीएनजीच्या दरात वाढ करणे आवश्यक झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

या दरवाढीचा सर्वाधिक परिणाम मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीचालकांवर होण्याची शक्यता आहे. दररोज वाहन चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या चालकांना आता इंधनासाठी अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. सीएनजीचे दर सातत्याने वाढत असल्याने वाहन चालवण्याचा खर्च वाढत आहे. त्यामुळे व्यवसायातून मिळणारा नफा कमी होत असल्याची चिंता चालकांकडून व्यक्त केली जात आहे. रिक्षा आणि टॅक्सी व्यवसाय परवडणार कसा, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.

…त्यांचा डीएनए तपासा, भाजपमध्ये राहून भाजपलाच विरोध?, मंदा म्हात्रेंचा गणेश नाईकांवर संताप

दुसरीकडे, खासगी सीएनजी वाहनधारकांनाही प्रत्येक किलोमागे अतिरिक्त 1.50 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे प्रवासाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. एकूणच, आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅसच्या वाढत्या किमती आणि देशांतर्गत पुरवठ्यातील कपातीचा परिणाम आता थेट मुंबईकरांच्या खिशावर होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या खर्चानंतर सीएनजी देखील महागल्याने सर्वसामान्य वाहनचालकांसमोर खर्चाचे नवे आव्हान उभे राहिले आहे.

follow us