कल्याणमध्ये रुग्णाला आजार समजावत असताना नातेवाईकाचा संताप; केबिनमध्ये घुसून डॉक्टरला मारहाण

रुग्णाच्या नातेवाईकाने थेट डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसून डॉक्टरला मारहाण केल्याने रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 08 24T100618.703

Doctor assaulted after barging into the cabin : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच आता कल्याणमध्ये देखील डॉक्टरला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याण पूर्वेतील नामांकित भानु ज्योत रुग्णालयात ही घटना घडली. रुग्णांच्य नातेवाईकाने थेट डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसून डॉक्टरला मारहाण केल्याने रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वाताववरं निर्माण झाले. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विनीत देशमुख हा आपल्या वडिलांना उपचारासाठी घेऊन भानु ज्योत रुग्णालयात आला होता. रुग्णावर उपचार सुरू असताना डॉक्टर योगेंद्र जयस्वाल हे त्यांच्या आजाराबाबत आणि उपचारांबाबत माहिती देत होते. डॉक्टर रुग्णाला त्याच्या प्रकृतीची आणि आजाराची माहिती समजावून सांगत असतानाच रुग्णाचा मुलगा विनीत देशमुख संतापला.

मिळालेल्या माहितीनुसार, विनीत देशमुख हा आपल्या वडिलांना उपचारासाठी घेऊन भानु ज्योत रुग्णालयात आला होता. रुग्णावर उपचार सुरू असताना डॉक्टर योगेंद्र जयस्वाल हे त्यांच्या आजाराबाबत आणि उपचारांबाबत माहिती देत होते. डॉक्टर रुग्णाला त्याच्या प्रकृतीची आणि आजाराची माहिती समजावून सांगत असतानाच रुग्णाचा मुलगा विनीत देशमुख संतापला.

 

या वेळी परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून रुग्णाने स्वतः आपल्या मुलाला डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर जाण्यास सांगितले. वडिलांनी सांगितल्यानंतर विनीत देशमुख सुरुवातीला केबिनच्या बाहेर गेला. मात्र, काही वेळानंतर तो पुन्हा डॉक्टरांच्या केबिनमध्ये परतला.

यानंतर विनीत देशमुख याने डॉक्टर योगेंद्र जयस्वाल यांच्याशी वाद घातला आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. डॉक्टरांच्या केबिनमध्ये अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रुग्णालयातील कर्मचारी आणि इतर उपस्थितांमध्येही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही काळ रुग्णालयातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्रकरणाची दखल घेतली. याप्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मारहाणीमागील नेमके कारण काय होते, याचाही तपास केला जात आहे.

दरम्यान, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. रुग्णांच्या उपचारादरम्यान डॉक्टरांना अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. मात्र, उपचारांबाबत नाराजी किंवा गैरसमज असला तरी डॉक्टरांवर हात उचलणे हा त्यावरचा मार्ग नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

रुग्णालयांमध्ये डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक आहे. उपचारादरम्यान काही गैरसमज किंवा तक्रार असल्यास ती रुग्णालय प्रशासनाकडे किंवा संबंधित यंत्रणेकडे मांडता येते. मात्र, थेट डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसून मारहाण करण्याच्या घटनांमुळे आरोग्यसेवेच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

डोंबिवलीतील घटनेनंतर आता कल्याणमध्येही डॉक्टरला मारहाण झाल्याने ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयांमधील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी रुग्णालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि डॉक्टरांना निर्भयपणे सेवा बजावता यावी यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी वैद्यकीय क्षेत्रातून होत आहे.

रुग्णालय हे उपचार आणि जीव वाचवण्याचे ठिकाण आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी संयम राखणे, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधणे आणि कोणतीही तक्रार असल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे. कल्याणमधील या घटनेनंतर आता पोलिसांच्या तपासात पुढे काय निष्पन्न होते आणि आरोपीविरोधात कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us