बारामतीत गोळीबार; इन्स्टाग्रामवरून मागितली 2 लाखांची खंडणी, नेमकं प्रकरण काय?

Firing on Baramati Builder Rajan Kolekar's Car: बारामतीतील बांधकाम व्यवसायिक राजन कोळेकरांच्या गाडीवर शनिवारी अज्ञातांनी गोळीबार केला.

Firing on Baramati Builder Rajan Kolekar's Car: बारामतीतील बांधकाम व्यवसायिक राजन कोळेकरांच्या गाडीवर शनिवारी अज्ञातांनी गोळीबार केला.

Firing on Baramati Builder Rajan Kolekar’s Car: बारामती शहरातील एमआयडीसी परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. बांधकाम व्यावसायिक राजन कोळेकर यांच्या गाडीवर शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुण्यात पुन्हा अतिक्रमण केल्यास दुकानं, हॉटेल कायमची सील होणार; महापालिका आयुक्तांचा कडक इशारा

या घटनेमागे खंडणीचा प्रकार असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. शनिवारी दुपारी राजन कोळेकर यांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीचा कॉल आला होता. या कॉलवरून त्यांच्याकडे 2 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास तीन अज्ञात हल्लेखोर कोळेकर यांच्या घराजवळ आले. घराचे गेट उघडून त्यांनी त्यांच्या गाडीच्या दिशेने दोन राऊंड फायर केले आणि घटनास्थळावरून पळ काढला.

सोनं खरेदी करू नका, मोदींच्या या आवाहनामुळे जनतेचे पैसे वाचले! सोन्याचे दर 30 हजारांनी घसरल्याचा दावा

गोळीबाराची माहिती मिळताच बारामती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांकडून फॉरेन्सिक टीमच्या मदतीने घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यात येत आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तीन संशयित हल्लेखोर घटनास्थळावरून पळून जाताना दिसल्याची माहिती आहे.

खाटू श्यामजींच्या भक्तांवर काळाचा घाला; धुळ्यातील 9 भाविकांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी

दरम्यान, यातील दोन हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे बारामतीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

follow us