बारामतीत खळबळ! झुंबा क्लासवरील कारवाई टाळण्यासाठी 7 लाखांची लाच; 5 लाख घेताना हवालदार रंगेहाथ पकडला
Baramati police बारामतीत झुंबा क्लास आणि जिमवरील कारवाई रोखण्यासाठी 7 लाखांची लाच मागणाऱ्या पोलिस हवालदाराला एसीबीने रंगेहाथ पकडले.
Baramati police constable caught taking bribe: बारामतीमध्ये झुंबा क्लास आणि जिमसंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारीवरील कारवाई रोखण्यासाठी बारामती पोलिस (Baramati police) ठाण्यातील हवालदार महेश अंकुश उगले (वय 36) याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले.
क्रूड 100 डॉलरजवळ पोहोचताच चिंता वाढली; सामान्य भारतीयांसह जगासाठी याचा अर्थ काय?
झालं असं की, तक्रारदाराची पत्नी झुंबा डान्स क्लास आणि जिम चालवतात. या क्लासेसमुळे परिसरातील लोकांना त्रास होतो, अशी तक्रार बारामती पोलिसात करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी पोलिस हवालदार महेश उगले यांच्याकडे देण्यात आली.
तर हवालदार उगले यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी थेट 7 लाख रुपयांची लाच मागितली. त्यानुसार दोन लाख रुपये हवालदाराला देण्यातही आले. नंतर झुंबा क्लासेस चालक दाम्पत्यांनी हवालदाराची तक्रार लाचलुचपत विभाग पुणे यांच्याकडे केली. त्यानंतर विभागाने उगलेंना रंगेहाथ पकडण्यासाठी पुढील सापळा रचला.
उगले 8 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता पी.डी.सी.सी. बँकेजवळ, माळेगाव रोड परिसरात उर्वरित 5 लाख रुपये घेण्यासाठी आले असता. पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम,1988 मधील कलम 7 अन्वये उगलेंवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील याच्या पथकाने केली.
Video : जरांगेंचा उपयोग संपला, आता सरकारला त्यांना मारायचंय; राऊतांचा गंभीर आरोप