मोदी ते सुनेत्रा पवार टीम इंडियावर राजकीय नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव! कोण, काय म्हणालं?

India vs New Zealand T 20 World Cup सर्वच क्षेत्रातून टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

Team India

India vs New Zealand T 20 World Cup  Political leaders shower best wishes on Team India, from Modi to Sunetra Pawar : टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी दारूण पराभव करत विश्वविजेतेपद पटकाविले. याचबरोबर भारताने एक इतिहास रचला आहे. घरच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत टी-20 वर्ल्डकप जिंकणारा, तिसऱ्यांदा वर्ल्डकप आणि सलग दोन वर्ल्डकप जिंकणारा भारत पहिला संघ ठरलाय. त्यानंतर सर्वच क्षेत्रातून टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते नुकताच उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी देखील टीम इंडियाच्या विजायवर शुभेच्छा दिल्या आहेत.

राजकीय नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव! कोण, काय म्हणालं?

विजेत्या भारतीय संघाला शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, चॅम्पियन्स! आयसीसी टी-20 वर्ल्डकप जिंकलेल्या भारतीय संघाचं अभिनंदन हा उल्लेखनीय विजय अपवादा‍त्मक कौशल्ये, दृढनिश्चय आणि टीमवर्क त्यांनी पूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. या विजयाने प्रत्येक भारतीयचं ह्रदय अभिमान आणि आनंदाने भरून गेलं आहे. वेल डन टीम इंडिया. असं म्हणत पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत.

मोदी ते सुनेत्रा पवार टीम इंडियावर राजकीय नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव! कोण, काय म्हणालं?

त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय क्रिकेट संघाचे मनापासून अभिनंदन केले आहे. या विजयानंतर आनंद व्यक्त करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भारतीय संघाने आज दाखवलेली जिद्द आणि सांघिक खेळ वाखाणण्याजोगा आहे. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून फायनलमध्ये मिळवलेला हा विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. या यशाने देशात पुन्हा एकदा दिवाळी साजरी होत आहे. कर्णधार आणि सर्व खेळाडूंचे मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो, असेही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

‘या’ चार राशींच्या आयुष्यात होणार मोठा बदल! जाणून घ्या 12 ही राशींचे आजचे राशीभविष्य

इतिहास रचला. भारताने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि इशान किशन यांच्या दमदार फलंदाजीमुळे सुरुवातीलाच संघाला विजय मिळवून दिला आणि भारताला नियंत्रणात आणले. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांच्या शानदार गोलंदाजीमुळे विरोधी संघावर दबाव कमी झाला नाही.सर्व विभागांमध्ये चांगल्या कामगिरीमुळे भारताने घरच्या मैदानावर विजय मिळवला. टीम इंडिया पुन्हा एकदा टी-२० विश्वचषक जिंकत असल्याने प्रत्येक क्रिकेट चाहत्यासाठी अभिमानाचा क्षण. असं म्हणत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत.

follow us