Vidhan Parishad MLC Result : मैत्रीपूर्ण लढतीत ‘कमळ’च वरचढ; कौस्तूभ गावडेंनी शिवसेनेचा पाठिंबा फेल ठरवला!

विधान परिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु असून पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप महायुतीचे कौस्तूभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.

WhatsApp Image 2026 10 28 At 1.01.36 PM

Pune MLC Result : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीची मतमोजणी कालपासून सुरु आहे. आज 24 तास उलटूनही अद्याप मतमोजणी प्रक्रिया सुरुच आहे. अशातच पुणे शिक्षक मतदारसंघातून मोठी अपडेट समोर आलीयं. पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेनेने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला धोबीपछाड देत भाजप महायुतीचे उमेदवार कौस्तूभ गावडे (Kaustubh Gawade) यांनी आपणच शिक्षकांचा आमदार होऊ शकतो हे सिद्ध करुन दाखवलंय. पुणे शिक्षक मदारसंघात कौस्तूभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर असून अद्याप विजयाची घोषणा करण्यात आलेली नाही. तर शिवसेनेने पाठिंबा दिलेले उमेदवार सचिन सानप दुसऱ्या क्रमांकावर आहेत. कौस्तूभ गावडे आणि सचिन सानप यांच्यात 6200 मतांचा फरक आहे. सानप यांच्या मतांची मोजणी अद्यापही सुरुच आहे. अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नसून विजयाबाबतही औपचारिकता बाकी आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात मविआच्या उमेदवार हर्षदा जाधव-देशमुख आणि भाजपच्या स्मिता जाधव यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत सुरु आहे. मविआच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांना 1 लाख 11 हजार 425 मते मिळाली असून भाजपच्या उमेदवार स्मिता जाधव यांना 1 लाख 2 हजार 554 मते मिळाली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख विजयाच्या उंबरठ्यावर असून विजयाची औपचारिकता बाकी आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

बातमी अपडेट होतेयं…

No liveblog updates yet.

LIVE NEWS & UPDATES

follow us