भाग्यश्रींची गणपती आरती अन् वाद पेटला; पटवर्धन घराण्यात उत्तराधिकारीपदावरून संघर्ष?
Actor Bhagyashree भाग्यश्रींच्या गणपती आरतीनंतर सांगली संस्थानातील वाद उफाळला. उत्तराधिकारीपदावरून पटवर्धन कुटुंबातील संघर्ष चर्चेत आला.
Actor Bhagyashree Ganpati aarti sparks controversy in Sangli: गणेशोत्सवाच्या काळात सांगली गणपती पंचायतन संस्थानातील पटवर्धन कुटुंबाचा अंतर्गत वाद पुन्हा समोर आला आहे. अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन (Actor Bhagyashree) यांनी गणपती मंदिरात केलेल्या आरतीनंतर संस्थानच्या उत्तराधिकारीपदाचा मुद्दा चर्चेत आला. भाग्यश्री यांनी मंदिरात पूजा केल्यावर विजयसिंह राजे पटवर्धन आणि राणी राजलक्ष्मी पटवर्धन यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. या सगळ्या घडामोडींमुळे पटवर्धन कुटुंबातील जुना वाद पुन्हा उफाळून आल्याचं दिसत आहे.
काय घडलं?
भाग्यश्री पटवर्धन या सांगलीचे राजा श्रीमंत विजयसिंहराव राजे पटवर्धन यांच्या थोरल्या कन्या आहेत. जवळपास चार वर्षांनंतर त्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सांगलीत आल्या. श्रींच्या आगमनानंतर दरबार हॉलमधील गाभाऱ्यात भाग्यश्री यांनी आपल्या बहिणीसोबत पूजा केली आणि आरती केली.
शिवसेना कुणाची? आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी; शिंदे गट बाजू मांडणार
मात्र, संस्थानचे युवराज आदित्यराजे पटवर्धन यांना थांबवून भाग्यश्री यांनी आरती केल्याने या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. त्यानंतर संस्थानच्या परंपरा आणि उत्तराधिकारीपदाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.
गाभाऱ्यात प्रवेशावरून विजयसिंह राजेंची नाराजी
भाग्यश्री यांच्या मंदिरातील प्रवेशावर विजयसिंह राजे पटवर्धन यांनी आक्षेप घेतला. गाभाऱ्यात प्रवेशासाठी कुटुंबाकडून ठरावीक नियम पाळले जातात, मात्र ते नियम पाळले गेले नसल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, “गाभाऱ्यात फक्त आमच्या कुटुंबाचे लोकच प्रवेश करु शकतात. ब्राह्मण, कोकणस्थ असले तर त्यांनाच आतमध्ये प्रवेश करण्याची परवानगी आहे. तो कायदा तोडून चार मारवाड्यांना घेऊन आतमध्ये नेले, लोकांना हे आवडलेलंही नाही. चार लोकांनी मला ऐकून दाखवलं. तुम्ही कशी परवानगी दिली. मी परवानगी दिलेली नाही. पण जबरदस्तीने त्या आल्या. मी मुलगी आहे मी काहीही करु शकते. तर याला काय समजायचे ते तुम्ही समजून घ्या”
UPI पेमेंटवर चार्ज लागणार का? ; केंद्र सरकारने दिली मोठी स्पष्टता!
आपली परवानगी नसताना भाग्यश्री यांनी गाभाऱ्यात प्रवेश करून पूजा केल्याचं विजयसिंह राजे यांनी म्हटलं. भाग्यश्री या मुलगी असल्यामुळे त्यांना संस्थानच्या नियमांमध्ये मनमानी करण्याचा अधिकार मिळत नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
आदित्यराजेंनाच उत्तराधिकारी मानलं
विजयसिंह राजे पटवर्धन यांनी आदित्य यांना दत्तक घेतलं असून त्यांना संस्थानचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळे युवराज आदित्यराजे पटवर्धन हेच संस्थानचे वारसदार असतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
तसंच, भाग्यश्री आणि त्यांचे पती हिमालय दासानी यांच्यासोबत संस्थानच्या मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये, असं आवाहन विजयसिंह राजे यांनी केलं. सांगलीकरांनी आदित्यराजेंना साथ द्यावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.
भाग्यश्रींचं स्पष्टीकरण
या प्रकरणावर भाग्यश्री पटवर्धन यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. विजयसिंह राजे यांची प्रकृती ठीक नसल्याने आपण अनेक वर्षांनी सांगलीत आल्याचं त्यांनी सांगितलं.
मोठी बातमी! परवानगी नाकारली तरी, जरांगे आज मुंबईकडे कूच करणार
पटवर्धन कुटुंबाची परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी तीन मुलींपैकी कोणीतरी सांगलीत उपस्थित राहणं आवश्यक असल्याचं भाग्यश्री यांनी म्हटलं. गणपती मंदिराशी आपलं लहानपणापासूनच नातं असून, मंदिरातील आठवणी आजही जपल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
गणेश चतुर्थीच्या दिवशी सांगलीत राहावं, या उद्देशाने आपण यंदा येथे आल्याचं भाग्यश्री यांनी स्पष्ट केलं. सांगलीतील मंदिरात दर्शन घेत आणि श्रींच्या आशीर्वादानेच आपण मोठे झालो, असंही त्यांनी सांगितलं.
काय आहे पटवर्धन कुटुंबातील जुना वाद?
पटवर्धन कुटुंबातील हा वाद काही वर्षांपासून सुरू आहे. 2013 ते 2016 या काळात संस्थानच्या कारभाराची जबाबदारी भाग्यश्री यांचे पती हिमालय दासानी यांच्याकडे होती. मात्र, संस्थानच्या जमिनी परस्पर विकल्याचा आरोप झाल्यानंतर विजयसिंह राजे यांनी त्यांच्याकडील अधिकार काढून घेतले.
यानंतर 2016 ते 2021 या काळात विजयसिंह राजे स्वतः संस्थानचा कारभार पाहत होते. 2021 मध्ये त्यांनी संस्थानची जबाबदारी जयदीप अभ्यंकर यांच्याकडे सोपवली.
रोख रक्कमच नाही, तर आता एटीएममध्ये मिळणार नवीन डेबिट, क्रेडिट कार्ड
यानंतर 2023-24 मध्ये जयदीप अभ्यंकर यांच्या 16 वर्षांच्या मुलाला, आदित्यला विजयसिंह राजे यांनी दत्तक घेतलं. त्यानंतर आदित्यराजेंना पटवर्धन संस्थानचा अधिकृत उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आलं. सध्या त्यांचा उल्लेख युवराज आदित्यराजे पटवर्धन असा केला जातो.
गणेशोत्सवात भाग्यश्री यांनी केलेल्या आरतीनंतर आता या जुन्या कौटुंबिक आणि संस्थानच्या उत्तराधिकारीपदाच्या वादाला पुन्हा तोंड फुटलं आहे.