राहुल गांधी व्हिएतनामहून परतताच देशात सत्तापरिवर्तन; संजय राऊतांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

Sanjay Raut Regime Change Statement : राहुल गांधींच्या व्हिएतनाम दौऱ्याची चर्चा सुरू असतानाच संजय राऊत यांचं त्तापरिवर्तनाचं विधान.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 21T152545.064

Sanjay Raut Regime Change Statement : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी दिल्लीतील आंदोलनानंतर व्हिएतनामला गेल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांच्या परदेश दौऱ्यावरून प्रश्न उपस्थित होत असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. राहुल गांधी व्हिएतनामहून परतल्यानंतर देशात सत्तापरिवर्तन होईल, असा दावा राऊत यांनी केला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी इंडिया आघाडी एकजूट असल्याचंही स्पष्ट केलं.

राहुल गांधी अचानक परदेशात गेल्याबाबत राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर हसत उत्तर देताना ते म्हणाले, “रिजीम चेंज होऊन जाईल, तुम्ही पाहत राहा. राहुल गांधी व्हिएतनामला गेले आहेत ना, ते परत आल्यानंतर बघा.” त्यांच्या या विधानामुळे देशातील सत्ताबदलाच्या शक्यतेवरून नव्याने चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सत्तापरिवर्तन नेमकं कोणत्या स्वरूपात होईल किंवा त्यासाठी विरोधकांची काय रणनीती असेल, याबाबत राऊत यांनी कोणताही तपशील दिलेला नाही.

जिल्हा बँक बिनविरोधला ब्रेक? राम शिंदेंकडून कर्जत- जामखेड मधील उमेदवारांची यादी जाहीर

यापूर्वीही संजय राऊत यांनी सोशल मीडियावर अल्बानियातील तीव्र आंदोलनाचा व्हिडिओ शेअर केला होता. जगातील अनेक देशांनी, विशेषतः भारताने, अशा घटनांमधून धडा घ्यायला हवा, असं त्यांनी त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्यांच्या या भूमिकेवरून त्यावेळी राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. आता राहुल गांधींच्या व्हिएतनाम दौऱ्याशी सत्तापरिवर्तनाचा संबंध जोडणाऱ्या विधानामुळे विरोधकांच्या भूमिकेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. काही जण या विधानाकडे विरोधकांच्या राजकीय रणनीतीचा भाग म्हणून पाहत आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या भाषणात भारतात फ्रान्स आणि बांगलादेशसारखं सत्तापरिवर्तन होऊ शकतं, मात्र देशात ‘रिजीम चेंज’ होऊ शकत नाही, अशी भूमिका मांडली होती. त्याआधी राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनीही सत्तापरिवर्तनाच्या अनुषंगाने आता जाण्याची वेळ आली असल्याचं विधान केलं होतं. या पार्श्वभूमीवर राऊत यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यांच्या दाव्यामागे नेमका कोणता राजकीय संकेत आहे आणि आगामी काळात विरोधकांकडून कोणती पावलं उचलली जातात, याकडे लक्ष लागलं आहे.

follow us