दिल्लीत मोठी दुर्घटना! तीन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली; ढिगाऱ्याखाली लोक अडकल्याची शक्यता
इमारत कोसळल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाला असून, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
The building collapsed like a house of cards : दिल्लीतून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण दिल्लीतील प्रसिद्ध सत्य निकेतन परिसरात रविवारी मोठी दुर्घटना घडली असून, येथील एक तीन मजली जुनी इमारत अचानक कोसळली आहे. इमारत कोसळल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाला असून, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, दुर्घटनेच्या वेळी इमारतीमध्ये नेमके किती लोक उपस्थित होते आणि ढिगाऱ्याखाली किती जण अडकले आहेत, याबाबत अद्याप कोणतीही निश्चित माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात असलेली ही तीन मजली इमारत जुनी होती. रविवारी ही इमारत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. इमारत कोसळण्याचा मोठा आवाज झाल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. काही वेळातच घटनास्थळी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली. इमारतीचा मोठा भाग कोसळल्याने परिसरात सर्वत्र ढिगारा पसरला असून, त्याखाली काही लोक अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी सुरुवातीला स्वतःच मदतीसाठी पुढाकार घेत बचावकार्य सुरू केले.
रावणाला एक लाख मुलं? मध्ये जेवला-बिवला की नाही? राज ठाकरेंची मिश्किल टोलेबाजी
दरम्यान, दुर्घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा हटवून त्याखाली कोणी अडकले आहे का, याचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले. ढिगाऱ्याखाली लोक अडकले असण्याची शक्यता असल्यामुळे बचाव पथकाकडून अत्यंत काळजीपूर्वक शोधमोहीम राबवली जात आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर ढिगारा असल्याने बचावकार्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तरीही अडकलेल्या नागरिकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत.
पेपरफुटीला बसणार लगाम? राज्यातील भरती प्रक्रियेत मोठ्या बदलांची तयारी, सरकारकडून उच्चस्तरीय समिती स्थापन
या दुर्घटनेनंतर सत्य निकेतन परिसरात मोठी गर्दी जमा झाली असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्नही प्रशासनाकडून सुरू आहेत. स्थानिक नागरिकांकडून बचाव यंत्रणांना मदत केली जात आहे. पाच मजली इमारत अचानक कोसळल्यामुळे आसपासच्या नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही इमारत नेमकी किती जुनी होती, तिची अवस्था कशी होती तसेच दुर्घटनेपूर्वी इमारतीमध्ये काही बांधकाम अथवा दुरुस्तीचे काम सुरू होते का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
इमारत नेमकी कशामुळे कोसळली, याचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुर्घटनेच्या वेळी इमारतीमध्ये किती नागरिक उपस्थित होते, ढिगाऱ्याखाली किती जण अडकले आहेत तसेच या दुर्घटनेत कोणी जखमी झाले आहे का, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. सध्या प्रशासनाचे संपूर्ण लक्ष बचावकार्यावर केंद्रित असून, ढिगारा हटवून अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. बचावकार्य पुढे गेल्यानंतर या दुर्घटनेची नेमकी व्याप्ती तसेच जीवित अथवा वित्तहानीबाबत अधिक माहिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.