बारावी पास उमेदावारांना नोकरीची सुवर्णसंधी, BMC मध्ये १३५ पदांची भरती, पगार 30 हजार रुपये पगार

बारावी पास उमेदावारांना नोकरीची सुवर्णसंधी, BMC मध्ये १३५ पदांची भरती, पगार 30 हजार रुपये पगार

आजच्या स्पर्धेच्या काळात नोकरी मिळवणं हे महाकठीण काम आहे. कारण देशात बेरोजगारी इतकी वाढली आहे की, नोकरी मिळवण्यासाठी खूप मेहनत आणि कसरत करावी लागते. मात्र, आता 12 वी उत्तीर्णांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, मुंबई महानगरपालिकेने आता वेगवेगळ्या गटातील कंत्राटी नोकरीभरतीची सुरूवात केली आहे. याच भरतीअंतर्गत आता लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात 135 पदांसाठी भरती होणार आहेत. 6 महिन्यांसाठी कंत्राटी बेसिसवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

23 मार्च 2023 पासून सकाळी 11 वाजल्यापासून 31 मार्च 2023 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या पदांसाठी आपल्याला अर्ज करता येणार आहे. 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्जाचे वितरण रोखपाल विभाग, कॉलेज बिल्डिंग, तळमजला, शिव येथे होत असून रविवार व सार्वजनिक सुट्टीचा वार वगळऊन हे 345 रुपयात हा अर्ज आपण करू शकता.

अर्जा सोबत जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला सादर करावा. त्याशिवाय, आधारकार्ड, पॅन कार्ड, बॅंकेचे पासबुकची प्रत अर्जासोबत जोडावी. महत्वाचं म्हणजे, या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा. कारण अर्ज करतांना उमदेवारांनी चुकीची माहिती, प्रमाणपत्रे, कागदपत्रे सादर केल्यास किंवा कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शणास आल्यास त्याचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे.

एकूण रिक्त पदे – 135 पदे

पदाचे नाव – प्रशिक्षित अधिपरिचारिका

शैक्षणिक पात्रता
1. उमेदवार बारावी पास व कमीत कमी परिचारिका पदासाठी आवश्यक असलेली जीएनएम
ही पदवी धारण केलेली असावी.
2. उमेदवार मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिलचा नोंदणीकृत असावा, किंवा त्यांनी नर्सिंग कौन्सील चे रजिस्ट्रेशन 3 महिन्यात मिळवावे.

वयोमर्यादा
खुल्या प्रवर्गाासाठी 18 ते 35 वर्ष
मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्ष सुट

पगार
30000 रुपये

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज शुल्क – 345 रुपये

अर्ज करण्याचा पत्ता
आवक – जावक विभाग,
तळ मजला, विद्यालय इमारत,
लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय

जाहिरात – https://drive.google.com/file/d/1m1ffHxY_W9wW-onFe8YNZw8-EtT90cbL/view

● अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च
● अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube