Atal Pension Yojana: महिन्याला पाच हजारांची पेन्शन हवी; दर महिन्याला किती पैसे भरावे लागणार ?

Atal Pension Yojana--गुंतवणूकदाराचे निधन झाल्यानंतर त्याच्या जोडीदाराला म्हणजे पत्नी किंवा पतीला ही रक्कम मिळते.

  • Written By: Published:
Atal Pension Yojana

Atal Pension Yojana: 60 वर्षानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेकांना पैशांची चिंता सतावते. सरकारी नोकरदार असेल तर बचत असते. पेन्शन ही चांगली मिळते. परंतु खासगी, असंघटित क्षेत्रातील लोकांमध्ये उतारवयात पैशांची मोठी चिंता असते. मुलांचे शिक्षण, लग्न, घर बांधणे यामुळे स्वत:कडील बचत संपलेली असते. अशावेळी तुम्हा छोट्या-मोठ्या खर्चासाठी मुलगा, सून, मुलगी यांच्यावर अवंलबून रहावे लागते. वय झाल्यानंतर म्हणजे 60 वर्षानंतर तुम्हाला महिन्याला पाच हजार रुपये रक्कम देणारी एक स्कीम आहे. अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) ही सरकारची स्कीम आहे. या स्कीमला देशभरातून जोरदार प्रतिसाद मिळतोय. कारण 21 एप्रिल 2026 पर्यंत या योजनेत नऊ कोटींहून अधिक नागरिक सहभागी झाले आहे. ही स्कीमबाबत आपण जाणून घेऊया…


अटल पेन्शन योजना काय आहे ?

अटल पेन्शन योजना ही एक सरकारी योजना आहे. ही योजना प्रामुख्याने असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी तयार करण्यात आली आहे. PFRDA म्हणजेच Pension Fund Regulatory and Development Authority द्वारे ही योजना चालवली जाते. या योजनेत तुम्ही एक हजार ते पाच हजारपर्यंतच्या मासिक पेन्शनची निवड करू शकता. जी वयाच्या 60 वर्षांनंतर मिळण्यास सुरुवात होते. तुम्हाला दरमहा एक ठराविक रक्कम जमा करावी लागते. ही रक्कम तुमचे वय आणि निवडलेल्या पेन्शनवर अवलंबून असते. ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यातून ऑटो-डेबिट म्हणजेच आपोआप कट होते. जर गुंतवणुकीवरील परतावा कमी पडला, तर सरकार किमान पेन्शनची हमी पूर्ण करते.

‘मिसिंग लिंक’ 1 मे पासून होणार खुला; पण, त्याआधी वाहनांसाठी निघालं SPEED नोटिफिकेशन


पेन्शनसाठी किती गुंतवणूक करावी लागेल?

वयाच्या 60 वर्षानंतर पाच हजार रुपयांची पेन्शन मिळवण्यासाठी लवकर नियोजन केले पाहिजे. वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात करतात त्यावर पेन्शनची रक्कम अवंलबून आहे. समजा तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सहभागी होण्याचे ठरविले तर कमी रक्कम महिन्याला भरावी लागणार आहे. तर जसे तुमचे वय वाढते, तसे दर महिन्याला जमा करणारी रक्कम वाढते. या योजनेत तुम्ही 18 व्या वर्षी सुरुवात केल्यास महिन्याला 210 रुपये भरावे लागतील. तर वयाच्या 30 व्या वर्षी या योजनेत सहभागी होण्यास ठरविल्यास महिन्याला 577 रुपये भरावे लागतील. तर 40 व्या वर्षी या योजनेत सहभागी होण्याचे ठरविल्यास महिन्याला 1,454 रुपये रक्कम भरावी लागणार आहे. त्यानंतर 60 वर्षानंतर महिन्याला पाच हजार रुपये पेशन्न मिळेल. तर नॉमिनी कॉर्पस रक्कम ही साडेआठ लाख रुपये होईल.

बारामतीचा एक राजकीय नेता खरातकडे पूजा… अजितदादांचा अपघात अन् रोहित पवारांनी थेट नाव घेतले


तुम्हाला रक्कम कशी मिळते ?

रक्कम भरणारी व्यक्ती 60 वर्षांची झाल्यानंतर दर महिन्याला पाच हजार पेन्शन म्हमून रक्कम मिळेल. तर गुंतवणूकदाराचे निधन झाल्यानंतर त्याच्या जोडीदाराला म्हणजे पत्नी किंवा पतीला ही रक्कम मिळते आणि दोघांचे निधन झाल्यास साडेआठ लाख रुपये रक्कम वारसदाराला मिळते.


योजनेत सहभागी होण्यासाठी अटी कोणत्या ?

अर्जदार भारतीय नागरिक असावा, वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे आवश्यक आहे, पैसे ऑटो-डेबिटद्वारे जमा होतील. जे लोक प्राप्तिकर (Income Tax) भरतात, ते नवीन नियमांनुसार या योजनेत सामील होऊ शकत नाहीत. प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आधार आणि मोबाईल नंबर देणे फायदेशीर ठरते.


पेन्शनची रक्कम बदलता येते का ?

अटल पेन्शन योजना लवचिक (Flexibility) आहे. जर भविष्यात तुमचे उत्पन्न वाढले किंवा गरजा बदलल्या, तर तुम्ही पेन्शनची रक्कम बदलू शकता. हा बदल वर्षातून एकदा, साधारणपणे एप्रिल महिन्यात करता येते.

follow us