बारामतीचा एक राजकीय नेता खरातकडे पूजा… अजितदादांचा अपघात अन् रोहित पवारांनी थेट नाव घेतले
Ajit Pawar's accident Rohit Pawar राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे माध्यमांशी बोलताना त्यांनी खळबळजनक दावा केला.
Baramati Political leader worship towards Kharat; Ajit Pawar’s accident Rohit Pawar directly took name : आज 28 एप्रिल राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला 3 महिने पुर्ण झाले. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे माध्यमांशी बोलताना त्यांनी खळबळजनक दावा केला. ते म्हणाले की, बारामतीमधील एक छोटा नेता आहे तो खरातच्या संपर्कात होता. अघोरी पूजा या छोट्या नेत्यांच्या माध्यमातून केली आहे.
फॅमिली प्लॅनिंगमध्ये अडथळे का येतात? जाणून घ्या कारणं…
पुढे ते म्हणाले की, अजित दादांच्या अपघाताला आज तीन महिने होत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून CID ला विनंती केली होती. आमच्याकडे अजुन काही पुरावे आहेत ते CID ला देण्यासाठी आलो होतो. पहिल्यांदा आलो सुनील रामानंद अधिकारी उपस्थित होते.दुसऱ्यांदा आलो तेव्हा काही अधिकारी होते. आज महत्वाचे अधिकारी नव्हते मुंबईला क्रिकेट मॅच होत्या तिकडे अधिकारी गेले आहेत. पुन्हा आल्यावर watch मन कडून माहिती घ्यावी लागेल…
मराठी सक्तीबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची काय भूमिका? टॅक्सी, रिक्षा चालक नो टेन्शन
कर्नाटकमधील FIR CID कडे पाठवा. पण शब्दाचा खेळ खेळत आहे. तपास करणार नाही तर इन्क्वायरी करणार अस सांगत आहेत. DGCA ने आम्हाला माहिती पाठवली आहे, विमानाचे मशीन कसे होते त्याचं रेकॉर्ड FDA मध्ये असते. Ntsb अमेरिकेची कंपनी आहे त्यांना यामध्ये घेतले आहे. कव्हर जळाला आहे अस सांगत होते. आता त्यांनी सांगितलं सगळी माहिती डाउनलोड झालीय.
मी एक गुगली टाकली आणि लगेच रिप्लाय आला…निलेश लंके यांचा थेट विखेंवर निशाणा
उद्या जाऊन कोणाचा अपघातात होऊ नये असा तपास करत आहेत. खरातच्या तपास cid ने घ्यावा. अजित दादांच्या घराजवळ बकरी टांगली होती. बारामतीमधील एक छोटा नेता आहे. तो खरातच्या संपर्कात होता. अघोरी पूजा या छोट्या नेत्यांच्या माध्यमातून केली आहे. 27,28 जानेवारीला खरातच्या अकॉउंटमधील उलाढाल का वाढली. एका शेतकऱ्याला खरातने सांगितलं होते पुढच्या कळात पवार कुटुंबावर आघात होऊ शकतो.
पोरीसोबत इथं का बसला विचारले; संतापलेल्या तरुणांचा थेट मंदिराच्या विश्वस्तावर कोयत्याने हल्ला
एक बारामतीचा राजकीय छोटा नेता आहे, तो खरातकडे जाऊन पूजा करत होता. तो दादांच्या नेत्यांच्या संपर्कात होता. तो छोटा नेता दादांच्या पेक्ष्याचा आहे, मोठया नेत्यांच्या करंगळी वैगरे कापल्या होत्या. आता याचं काही कापलेय का ते पाहावं लागेल. माझं एक मत आहे MLC देण्याची वेळ आलीय ते दादांच्या बाजूने बोलत आहेत त्यांना दिली पाहिजे. पैसे वाल्याला, नेत्याच्या पोराला,पुतण्याला कोणाला न्याय मिळतोय हे पाहावं लागेल. कर्नाटकचा FIR CID कडे अलाय आम्हाला वाटले तपास होईल. मात्र आता समजतेय इन्क्वायरी केली जाणार आहे.
डोंबिवलीत रंगला अनोखा बुक स्ट्रीट उपक्रम ; 9 हजारहून अधिक वाचक सहभागी
DGCA वर आमचा विश्वास नाहीये, आमची मागणी होती, एक संस्था दिली आहे, अमेरिकेची संस्था आहे ब्लँक बॉक्सचा तपास करणार आहे. 2023 ला जो असिसिडेन्ट झाला vsr चा त्याचा अजून रिपोर्ट नाही आला तो कधी येणार? महाराष्ट्रमधील कॉन्ट्रॅक्टर आंदोलन करत आहेत, दादाचा अपघातात झाल्यापासून 145 कोटी रुपये सरकारने दिले… 27,28 जानेवारी बक्षीस म्हणून 9 कोटी दुसऱ्या दिवशी 16 कोटी 88 लाख vsr ला दिले.
एका मोठया पत्रकाराच्या मुलीचं लग्न होते तेव्हा v.k सिंग मोठया नेत्याला भेटला. अजित पवारांच्या अपघातात खरातचा संबंध दिसतोय. त्याचा तपास CID ने केला पाहिजे. खरातचे काही विडिओ ब्लँक मेल करण्यासाठी ठेवले तर सामान्य महिलांचे विडिओ बाहेर आले.