Air India मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, विविध पदांची बंपर ओपनिंग्ज, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Air India मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, विविध पदांची बंपर ओपनिंग्ज, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Air India Engineering Services Limited Recruitment : एअर इंडियामध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. Air India Engineering Services Limited (AIESL) ने 57 विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये एअरक्राफ्ट टेक्निशियन पदाच्या विविध जागांसाठी भरती केली जाणार आहे. त्यात एअरक्राप्ट टेक्निशियन (देखभाल/इंजिन शॉप), विमान तंत्रज्ञ (देखभाल), तंत्रज्ञ (वेल्डर), तंत्रज्ञ (मशीनिस्ट) च्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://aiesl.airindia.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्जाची अंतिम तारीख याबद्दल तपशीलवार माहिती अधिकृत नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.

https://www.youtube.com/watch?v=GsbY79qUnKg

पदाचे नाव –
विमान तंत्रज्ञ (देखभाल/इंजिन शॉप), विमान तंत्रज्ञ (देखभाल), तंत्रज्ञ (वेल्डर), तंत्रज्ञ (मशिनिस्ट).

शैक्षणिक पात्रता –
एअरक्राफ्ट टेक्निशियन – एएमई डिप्लोमा/एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंगचे प्रमाणपत्र
एअरक्राफ्ट टेक्निशियन (देखभाल) – एएमई डिप्लोमा/एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंगचे प्रमाणपत्र
तंत्रज्ञ (वेल्डर) – केंद्र / राज्य सरकार किंवा NCVT द्वारे मान्यताप्राप्त, वेल्डर ट्रेडमध्ये ITI सह 10+2 उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह)
तंत्रज्ञ (मशिनिस्ट) – केंद्र/राज्य सरकार किंवा NCVT द्वारे मान्यताप्राप्त, मशीनिस्ट ट्रेडमध्ये ITI सह 10+2 (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन.

संजय राऊतांच्या विधानावर धनंजय मुंडेंनी ठेवलं बोट! म्हणाले, राऊत पवार कुटुंबाचे.., 

अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग आणि ओबीसी – रु.1000.
SC/ST/माजी सैनिक उमेदवार – रु.500/-

नोकरी ठिकाण – नागपूर

अर्ज सुरू होण्याची तारीख – 11 ऑगस्ट 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2023

अधिकृत वेबसाइट – http://aiesl.airindia.in/

मुलाखतीचे वेळापत्रक आणि पत्ता:
या भरतीमधील निवड होणाऱ्या उमेदवारांना 1 सप्टेंबर 2023 नंतर मुलाखतीसाठी बोलावले जाईल. प्लॉट नंबर 1, सेक्टर 9, सेझचे अधिसूचित क्षेत्र, खापरी मेट्रो आणि रेल्वे स्टेशन जवळ, नागपूर, महाराष्ट्र 441 108

जाहिरात –
https://www.aisl.in/Doc/Careers/AMT_walkin%20_Advertisement%20Nagpur_110823.pdf

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube