एम्समध्ये नर्सिंग ऑफीसर पदांच्या 3055 रिक्त जागांसाठी बंपर भरती, महिन्याला मिळणार 1 लाख 42 हजार रुपये पगार

Untitled Design   2023 04 17T202430.245

All India Institute of Medical Science Recruitment : देशभरातील ऑल इंडिया इन्स्सिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये नोकरी करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र, आजच्या स्पर्धेच्या युगात महत्वाच्या इन्सिट्यूटमध्ये नोकरी मिळवणं फार कठीण काम आहे. दरम्यान, तुम्हाला नोकरी नसेल आणि तुम्ही  ऑल इंडिया इन्स्सिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची गुड न्यूज आहे. दिल्लीच्या आयुर्वेदिक विज्ञान संस्थेने ऑफीसर भरती संयुक्त पात्रता परिक्षेसाठीचे (एम्स नर्सिंग ऑफिसर भरती) नोटिफिकेशन जारी केले आहे. या नोटिफिकेशमध्ये शैक्षणिक पात्रात, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची तारीख यांचा सविस्तर तपशील दिला आहे. 12 एप्रिलला जारी झालेल्या नोटिफिकेशननुसार, AIIMS आणि NITRD एकूणण 3055 नर्सिंग ऑफीसर (Nursing Officer) पदांची भरती करणार आहे.

जे उमेवादवार एम्स नर्सिंग ऑफिसर भरती परिक्षेसाठी अर्ज करू इच्छित आहे, ते या परिक्षेसाठी अधिकृत वेबसाईटवर norcet4.aiimsexams.ac.in वर जाऊन उपलब्ध असलेला ऑनलाईन अर्ज भरू शकतात. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये उमेदवारांना पहिल्यांदा नोंदणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर नोंदणीकृत तपशीलााच्या आधारे लॉग-इन करावे लागेल. महत्वाचं म्हणजे, या भरतीसाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयाच्या मर्यादेत सुट देण्यात आली आहे.

ऑल इंडिया इन्स्सिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या या पदभरतीसाठी अर्ज करतांना उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, ओळपत्र, पासपोर्ट साईज फोटो हे कागदपत्रे अर्जासोबत जोडणं गरजेचं आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्रता धारक उमेदेवारांनी संबंधित नोटिफिकेशन नीट वाचावे. कारण, अर्जात काही त्रुटी असल्यास अर्ज बाद करण्यात येईल.

एकूण पदे – 3055

पदाचे नाव – नर्सिंग ऑफिसर

पात्रता
कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बीएससी नर्सिंग किंवा बीएससी नर्सिंग पदवी प्राप्त अशावी.
कोणत्याही राज्यातून नर्सिंग परिषदेमध्ये नर्स किंवा मिडवाईफ म्हणून नोंदणी असावी.

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला सदाभाऊ खोत यांनी नमवले; शेतकऱ्याचा जप्त केलेला टेम्पो सोडवला

वयाची मर्यादा
18 वर्षांपेक्षा कमी किंवा 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
केंद्र सरकारच्या नियमानुसार आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयाच्या मर्यादेत सवलत देण्यात आली आहे.

पगार – 49900 ते 142400

अर्ज करण्यासाठी फी
जनरल आणि ओबीसी – 3000
एससी, एसीटी आणि इड्ब्लूस – 2400

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची अंतिम तारिख – 5 मे  2023

जाहिरात
http://norcet4.aiimsexams.ac.in/Pdf/NITRD%20advertisement%20for%20NORCET%204.pdf?AspxAutoDetectCookieSupport=1

अर्ज भरण्यासाठीची लिंक
https://aiimsexams.ac.in/index.html

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube