अब्जाधीशाचे अमर होण्याचे स्वप्न, तरुण होण्यासाठी केली रक्ताची अदलाबदली

अब्जाधीशाचे अमर होण्याचे स्वप्न, तरुण होण्यासाठी केली रक्ताची अदलाबदली

Stay Young Project: जसे जसे वय वाढत जाते तसे प्रत्येकाला चिंता वाटत राहिते वृद्ध होण्याची. त्यासाठी वेगवेगळ्या उपायही करतात. कोणी महागडे प्रोडक्ट वापरतात तर कोणी जीममध्ये तासंनतास घालवतात. पण वय कोणाला रोखता येतं का? असा प्रयत्न अमेरिकेतील एका व्यक्तीने केला. यासाठी त्यांनी ‘ब्लड बॉय’ प्रकल्पच हाती घेतला होता. हा ‘ब्लड बॉय’ प्रकल्प काय आहे ते पाहूया…

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे राहणारे ब्रायन जॉन्सन हे वृद्धत्व रोखण्यासाठी संशोधन करत असतात. ते कायम तरुण राहण्याचे स्वप्न पाहतात. त्यासाठी ते दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. या संशोधनात त्यांनी आपल्या किशोरवयीन मुलासोबत रक्ताची अदलाबदली केली होती. कदाचित आपल्या तरुण मुलाचे रक्त आपल्याला तरुण ठेवू शकेल असा त्याचा विश्वास होता, परंतु ते यात अपयशी ठरले आहेत. यानंतर त्यांनी ‘ब्लड बॉय’ प्रकल्प रद्द केला आहे. त्यानुसार त्यांचे तरुण होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.

पिता-पुत्रांमध्ये रक्ताची अदलाबदली झाली
ब्रायनने ब्रेंट्री वेनमो नावाचा व्यवसाय सुरू केला. यासाठी त्यांनी 10 वर्षांपूर्वी पेमेंट कंपनी PayPal ला $80 दशलक्षमध्ये विकले होते. आपल्या प्रकल्पात त्यांनी त्यांचे 70 वर्षीय वडील रिचर्ड आणि 17 वर्षांचा मुलगा टैलमेज यांच्यासोबत रक्ताची अदलाबदली केली. गेल्या आठवड्यात त्यांनी ट्विट केले होते की त्यांचा मुलगा आणि वडिलांचे एक लिटर रक्त वाया गेले आहे. जॉन्सनच्या शिरामध्ये टैलमेजचा प्लाझ्मा टाकण्यात आला. तर जॉन्सनचा प्लाझ्मा त्यांचे वडील रिचर्ड यांच्या शरीरात टाकण्यात आला.

माझे रक्त वडिलांना दिले
तथापि, इमेजिंग आणि बायोमार्कर चाचण्यांनी त्यांच्या लक्षात आले की मुलाचे रक्त चढवल्यानंतरही कोणताही फायदा झाला नाही. जैविक दृष्ट्या वृद्ध लोकसंख्येमध्ये तरुण प्लाझ्मा बदलणे काही विशिष्ट परिस्थितींमध्ये फायदेशीर ठरू शकते. पण माझ्या प्रकल्पात याचा फायदा झाला नाही. मात्र, त्याचा वडिलांवर काय परिणाम झाला हे पाहणे बाकी आहे. स्वत:ला 18 वर्षाचा तरुण टिकवून ठेवण्यासाठी ब्रायन दरवर्षी 16.45 कोटी रुपये खर्च करतात.

‘Baipan Bhari Deva’ फेम अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली, “लोक इतकी नजर लावतात…”,

दिनचर्या कशी आहे
जॉन्सन दररोज 80 जीवनसत्त्वे आणि खनिजे घेतात. एका महिन्यात, ते 31.5 किलो शुद्ध भाज्या घेतात. तसेच 25 वेगवेगळ्या व्यायामांसह एक तासभर व्यायाम करतात. त्यांचा डायट अतिशय कडक आहे, ज्यामध्ये ते फक्त 1977 कॅलरीज खातात. त्यांनी त्याच्या आतड्याच्या आतील बाजूची 33,000 हून अधिक छायाचित्रे घेतली आहेत.

Jawan: किंग खानचा जलवा पाहून भाईजान झाला खूश! ‘जवान’ प्रीव्यू शेअर करत म्हणाला…

आणखी 30 डॉक्टर आरोग्यावर लक्ष ठेवून आहेत
30 हून अधिक डॉक्टरांचे पथक त्यांचे रक्त, हृदय, यकृत, मूत्रपिंड, मेंदू, रक्तवाहिन्या आणि लैंगिक आरोग्याचे नियमितपणे तपासण्या करतात. त्यांच्या दाव्यानुसार, त्यांच्याकडे 37 वर्षांच्या वृद्धाचे हृदय, 28 वर्षांच्या तरुणाची त्वचा आणि 18 वर्षांच्या तरुणाची फिटनेस आहे. ते म्हणतात की माझा मरण्याचा कोणताही हेतू नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube