Union Budget 2023 : अ‍ॅनिमिया रोखण्यासाठी अर्थसंकल्पात उचलले महत्त्वाचे पाऊल

Union Budget 2023 : अ‍ॅनिमिया रोखण्यासाठी अर्थसंकल्पात उचलले महत्त्वाचे पाऊल

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्याकडून बजेट सादर करण्यास सुरूवात झाली आहे. भाषणाच्या सुरुवातीला त्या म्हणाल्या, 2023-24 साठीचा अर्थसंकल्प मी सादर करत आहे. यामध्ये त्यांनी आरोग्य क्षेत्रासाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या त्या म्हणाल्या…

आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी त्याचबरोबर 2014 पासून आतापर्यंत स्थापन करण्यात आलेल्या 157 मेडिकल कॉलेज सह-संस्थांच्या रूपात 157 नव्या नर्सिंग कॉलेजांची स्थापना करण्यात येईल. त्याचबरोबर या कॉलेजांमध्ये जास्तीत जास्त लॅबची स्थापना करण्याात येणार आहे. नवीन मशीन आणण्यात येतील.

2027 पर्यंत अ‍ॅनिमिया आजाराचे मुळापासून उच्चाटन करायचे आहे. कारण रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक लोकांचा मृत्यू होत असतो. लोकांना स्वच्छ पाणी आणि चांगले जेवण मिळणे गरजेचे त्यामुळे याला या बजेटमध्ये स्वच्छ पाणी आणि चांगले जेवण याला प्राथमिकता देण्यात आली आहे.

आता मॅनहोलमध्ये माणसं उतरणार नाही. कारण यामुळे दरवर्षी अनेक लोकांचा मृत्यू होत असतो. अ‍ॅनिमिया आणि लहान मुलांमध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांसाठी योजना तायार करण्यात आल्या आहेत. 2047 पर्यंत आजाराचे मुळापासून उच्चाटन करायचे आहे. तसेच यावर्षी भरड धान्याच्या वापराला प्राधान्या देण्यात येणार.

देशभारात ICMR ची संख्या वाढवण्यात येणार. वैद्यकीय क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जाईल. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी नवीन कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे.

कुटुंब कल्याण मंत्रालयासाठी 86 हजार 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. आर्थिक वर्ष 2020-21 मधील 73, 932 कोटी रुपयांच्या तुलनेत हे सुमारे 16.5 टक्क्यांनी वाढले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube