बॅंक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, मासिक पगार, 89 हजार 890 रुपये

बॅंक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, मासिक पगार,  89 हजार 890 रुपये

Bank of Baroda Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी गुड न्यूज आहे. देशातील देशातील बॅंकिंग क्षेत्रातील नावाजलेली महत्वाची अग्रगण्य बॅंक असलेल्या बॅंक ऑफ बडोद्या (Bank of Baroda) ने विविध पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. बॅंक ऑफ बडोद्यामध्ये रिलेशनशिप मॅनेजर, फॉरेक्स एक्विजिशन तसेच रिलेशनशिप मॅनेजर आणि क्रेडिट अॅनॅलिस्टच्या विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केला नाही, ते बॅंक ऑफ बडोद्याच्या अधिकृत संकेतस्थळ bankofbaroda.in ला भेट देऊन रिक्त जागांसाठी अर्ज करू शकतात.

बॅंक ऑफ बडोदाद्वारे जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, या भरती अंतर्गत अभियानाच्या माध्यमातून विविध पदांवर एकून 157 पदांवर भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवार हे 17 मे 2023 पर्यंत अर्ज करू शकता.

या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख यासंबंधीची माहिती Bank of Baroda ने प्रसिध्द केलेल्या जाहीरातीमध्ये देण्यात आली आहे.

एकूण पदे – 157
पदांचा तपशील
रिलेशनशिप मॅनेजर स्केल 4 – 20 पदे
रिलेशनशिप मॅनेजर स्केल 3- 46 पदे
केडिट मॅनेजर स्केल 3 – 68 पदे
केडिट अॅनॅलिस्ट स्केल 3 – 06 पदे
फॉरेक्स एक्विजिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर स्केल 2 – 12 पदे
फॉरेक्स एक्विजिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर स्केल 3 – 05 पदे

शैक्षणिक पात्रता –
मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून संबंधित विषयासह कमीत कमी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. याशिवाय, संबंधित क्षेत्रातील अनुभव देखील मागितला आहे.

Horoscope Today, 11 May 2023: ‘या’ राशींना मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…

वयोमर्यादा
वयोमर्यादेबाबत सांगायचे झाल्यास 1 एप्रिल 2023 पर्यंत उमेदवारांचे वय हे कमीत कमी 25 वर्ष असावं, आणि जास्तीत जास्त 45 वर्ष असावं.

जाहिरात
https://www.bankofbaroda.in/-/media/Project/BOB/CountryWebsites/India/Career/23-04/notification-dated-27-04-2023-re-opening-of-application-26-17.pdf

पगार
MMGS II : Rs. 48170 x 1740 (1) – 49910 x 1990 (10) – 69180
MMGS III : Rs. 63840 x 1990 (5) – 73790 x 2220 (2) – 78230
SMG/S-IV : Rs. 76010 x 2220 (4) – 84890 x 2500 (2) – 89890

अर्ज कसा करायचा ?
उमदेवारांनी सगळ्यात आधी बँक ऑफ बडोदाच्या संकेतस्थळावर जावे. त्यानंतर होम पेजवर करिअर टॅबमध्ये Current Opportunities या पर्यायावर क्लीक करावं. त्यानंतर ‘Specialist Officers for Corporate & Institutional Credit Dept. on Regular basis’ लिंकवर क्लिक करा. क्लिक केल्यावर ‘Apply Now’ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर अर्ज ओपन होईल. अर्ज ओपन झाल्यावर आपली योग्य माहिती आणि महत्वाचे कागदपत्रे अपलोड करा. आणि फि भरा. ही सगळी प्रक्रिया केल्यानंतर फॉर्म डाऊनलोड करा आणि प्रिंट घ्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube