केंद्र सरकारची मोठी कारवाई, खोट्या बातम्या दाखवणाऱ्या 6 यूट्यूब चॅनेलवर बंदी
दिल्ली : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने खोट्या बातम्या पसरवणाऱ्या सहा यूट्यूब चॅनेलवर कारवाई केली आहे. या सहा चॅनेलचे 20 लाखापेक्षा जास्त सबस्क्राईबर होते. याशिवाय या चॅनलच्या व्हिडिओंना 50 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या वाहिन्यांची नावे आहेत- नेशन टीव्ही, सरोकार भारत, नेशन 24, संवाद समाचार, स्वर्णिम भारत, संवाद टीव्ही.
Total around 111 videos, 6 channels combined subscriber base of over 20 lakh & total video views over 50 crore have been found to be propagating Fake News regarding the President, Prime Minister & several Union Ministers & Supreme Court of India.@PIBFactCheck pic.twitter.com/86hBbcFygc
— PB-SHABD (@PBSHABD) January 12, 2023
हे यूट्यूब चॅनेलवर खोटी माहिती, क्लिकबेट आणि सनसनाटी इमेज आणि टीव्ही चॅनेलच्या टेलिव्हिजन न्यूज अँकरच्या प्रतिमांचा वापर करून दर्शकांची दिशाभूल करत असल्याची माहिती पीआयबीकडून देण्यात आली. ‘संवाद टीव्ही’ नावाने चालणाऱ्या यूट्यूब चॅनेलचे 10 लाखांहून अधिक सदस्य होते. या चॅनलद्वारे भारत सरकार आणि केंद्रीय मंत्र्यांबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या.