‘ब्लॅक फंगस’च्या रुग्णांना थ्रीडी तंत्रज्ञानाने मिळणार नवा चेहरा, IIT मद्रासच्या विद्यार्थ्यांनी केला चमत्कार

‘ब्लॅक फंगस’च्या रुग्णांना थ्रीडी तंत्रज्ञानाने मिळणार नवा चेहरा, IIT मद्रासच्या विद्यार्थ्यांनी केला चमत्कार

Black Fungus : ब्लॅक फंगसमुळे (Black Fungus) चेहरा खराब झालेल्या रुग्णांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. IIT मद्रासने (IIT Madras) ‘Jorioux Innovation Labs’ च्या सहकार्याने ब्लॅक फंगसच्या रुग्णांसाठी 3D-प्रिंट केलेले फेशियल इम्प्लांट विकसित केले आहे. ‘ब्लॅक फंगस’मुळे खराब झालेला चेहरा थ्रीडी-प्रिंटिंग तंत्रज्ञानाद्वारे नवीन चेहरा मिळणार आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मद्रासच्या संशोधकांमुळे हे शक्य झाले आहे. या फंगसचा प्रभाव कोविड-19 रुग्णांमध्ये तसेच अत्यंत गंभीर मधुमेह, एचआयव्ही-एड्स आणि इतर आजार असलेल्या रुग्णांमध्ये दिसून आला आहे. आत्तापर्यंत आर्थिक दुर्बल घटकातील 50 रुग्णांचे चेहरे दुरुस्त करण्यात आले आहेत.

कसं शक्य झालं?
चेन्नईतील दंत शल्यचिकित्सकांची स्टार्टअप असलेल्या ‘ZorioX Innovation Labs’ च्या सहकार्याने IIT ने हा पुढाकार घेतला आहे. त्याचा आधार मेटल 3D प्रिंटिंग किंवा अॅडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग आहे. ‘ब्लॅक फंगस’ रोगाचा उद्रेक हा भारतातील एक प्रमुख चिंतेचा विषय आहे.

कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच; विनेश फोगटने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केला

या आजाराला ‘म्युकोर्मायकोसिस’ म्हणतात. त्याच्या सर्वात गंभीर धोक्यांपैकी एक म्हणजे चेहरा खराब होतो. यामुळे रुग्णाला गंभीर मानसिक आणि भावनिक आघात होतो. अशा परिस्थितीत ‘ब्लॅक फंगस’मुळे विद्रुप झालेले चेहरे पुन्हा पहिल्यासारखे करणे अत्यावश्यक आहे. कोविडमुळे म्युकोर्मायकोसिसची जवळपास 60 हजार प्रकरणे भारतात नोंदवली गेली.

म्यूकोर्मायकोसिसची बुरशी चेहऱ्याच्या ऊतींना नष्ट करू शकते आणि विकृत चेहरा करू शकते. अधिक गंभीर प्रकरणांमध्ये, रुग्ण त्यांचे नाक, डोळे किंवा संपूर्ण चेहरा गमावू शकतात. इतकेच नाही तर अशा महत्त्वाच्या अवयवांवर वाईट परिणाम होत असल्याने रुग्णाला श्वास घेणे, खाणे आणि बोलणेही कठीण होऊ शकते. एकूणच त्यांचे जगणे अवघड होऊन बसते.

पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदाच हिंदू महिला, कोण आहेत सवीरा प्रकाश?

ब्लॅक फंगसमुळे चेहऱ्याचे विद्रुपीकरण झालेल्या रुग्णांसाठी पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया हा एक व्यवहार्य उपाय आहे. अशा रीतीने रुग्णाला त्याचे हरवलेले स्वरूप परत मिळते आणि त्याचे कार्य पुन्हा सुरू करता येते.त्याचे आयुष्य तो अधिक सहजतेने जगू शकतो. महत्त्वाचे म्हणजे प्रत्यारोपण तयार करणे आणि प्रत्येक रुग्णानुसार शस्त्रक्रिया करणे महाग आहे. त्यामुळे समाजातील दुर्बल घटकांसाठी ते आवाक्याबाहेर आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube