खास कैरीचा भात

खास कैरीचा भात

साहित्य :

आवश्यकतेनुसार कैरी
1.2 कप किसलेले नारळ
आवश्यकतेनुसार कढीपत्ता
आवश्यकतेनुसार लाल मिरची
1 कप बासमती तांदुळ
1.2 कप नारळाचे तेल
1 चमचे मोहरीच्या बिया
1 चमचे काळे जिरे
1 चमचे चणा डाळ
1 चमचे उडदाची डाळ
आवश्यकतेनुसार हळद
आवश्यकतेनुसार हिंग
आवश्यकतेनुसार कच्चे शेंगदाणे
आवश्यकतेनुसार पूड मेथीचे दाणे
आवश्यकतेनुसार गूळ
आवश्यकतेनुसार मीठ

कृती :

Step 1: लाल मिरच्या व किसलेले खोबरे भाजून घ्या
एका पॅनमध्ये तेल घ्या. त्या तेलात २ ते ३ लाल मिरच्या चांगल्या फ्राय करून घ्या. आता मिरच्या काढून त्याच पॅनमध्ये किसलेले सुके खोबरे घेऊन ३ ते ४ मिनिटे चांगले भाजून घ्या. गॅस बंद करून त्या लाल मिरच्या व भाजलेले खोबरे मिक्सरच्या भांड्यात घ्या.

Step 2: सर्व सामग्रीची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या
आता मिक्सरच्या भांड्यात लाल मिरच्या, भाजलेले खोबरे, जिरे, भाजलेली मेथी पावडर, कैरी व गुळ घाला. थोडसं पाणी घालून सर्व सामग्रीची चांगली बारीक पेस्ट करून घ्या.

Step 3: मोहरी, चणा डाळ, उडीद डाळ, शेंगदाणे, हळद, हिंग व कडीपत्ता गोल्डन ब्राऊन रंगाचं होईपर्यंत फ्राय करा
आता पॅनमध्ये तेल घेऊन त्यात मोहरी, चणा डाळ, उडीद डाळ, शेंगदाणे, हळद, हिंग व कडीपत्ता घाला व गोल्डन ब्राऊन रंगाचं होईपर्यंत सर्व सामग्री चांगली फ्राय करा.

Step 4: पेस्टमध्ये शिजवलेला भात घाला व सर्व सामग्री चांगली मिक्स करा
आता मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट पॅनमधील सामग्रीमध्ये घाला. पुढे, शिजवलेला भात घालून सर्व सामग्री चांगली मिक्स करा. आता त्यात मीठ घालून सर्व साहित्य पुन्हा एकदा मिक्स करून घ्या.

Step 5: तयार आहे आपला चटपटीत कैरीचा भात!
तयार आहे आपला चटपटीत कैरीचा भात! या गरमा गरम भाताचा आपण कोशिंबीर किंवा कोथिंबीर-पुदीना चटणीसोबत आस्वाद घेऊ शकतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube